पीटीआय, डेहराडून : अनेक आव्हाने असतानाही भारताने गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे आपली अर्थव्यवस्था बळकट केली आहे त्याचे जग कौतुक करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्ली- डेहराडून वंदे भारत एक्स्प्रेसचे दूरसंवादाद्वारे उद्घाटन करताना सांगितले.  उत्तराखंडमधील रेल्वेमार्गाच्या शंभर टक्के विद्युतीकरणाचेही पंतप्रधानांनी या वेळी उद्घाटन केले. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली उत्तराखंडसाठीची अशा प्रकारच्या या पहिल्या गाडीमुळे डेहराडून आणि राष्ट्रीय राजधानीदरम्यानचा प्रवास साडेचार तासांमध्ये करता येणार आहे.

सध्या शताब्दी एक्स्प्रेस हे अंतर सहा तास व दहा मिनिटांमध्ये कापते. ‘जागतिक पर्यटक हा देश पाहण्यासाठी व समजून घेण्यासाठी भारताला भेट देतात. उत्तराखंडसाठी ही फार मोठी संधी आहे,’ असे पंतप्रधान उद्घाटनप्रसंगी म्हणाले. मी आत्ताच तीन देशांच्या दौऱ्यावरून परतलो असून, जग भारताकडे मोठय़ा आशेने पाहते, असे मी सांगू शकतो, असे या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी

धामी यांची पंतप्रधान, रेल्वेमंत्र्यांबद्दल कृतज्ञता

डेहराडून : देवभूमी उत्तराखंडला वंदे भारत एक्स्प्रेस दिल्याबद्दल आणि राज्यातील सर्व रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केल्याबद्दल मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील नागरिकांच्या वतीने पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या विशेष प्रेमामुळे डेहराडून ते दिल्ली प्रवास केवळ साडेचार तासांत पूर्ण होईल, असे धामी म्हणाले.  ‘उत्तराखंडच्या पहाडांवर रेल्वे नेण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे,’ या शब्दांमध्ये त्यांनी आनंद व्यक्त केला.