भूसंपादन आणि पर्यावरणविषयक मंजुरी लांबल्यामुळे देशभरात २७० प्रकल्प रखडले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा भूसंपादनाच्या अडचणी, पर्यावरणविषयक मंजुरी न मिळणे, रेल्वे पुलांच्या समस्या या कारणांमुळे २७०हून अधिक प्रकल्प रखडले होते. या प्रकल्पांची अंदाजे किंमत ३ लाख ८० हजार कोटी रुपये असल्याचे गडकरी म्हणाले.
देशाकरता ही बाब चांगली नसून, ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाचे ४४ प्रकल्प आम्ही रद्द केले असून, उर्वरित प्रकल्पांचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. ईशान्येकडील ८ राज्यांमध्ये २६ प्रकल्पांबाबत समस्या आहेत. राज्यांचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत बैठकीनंतर या महिनाअखेपर्यंत या समस्या सोडवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2015 रोजी प्रकाशित
विविध कारणांनी २७० प्रकल्प रखडले -गडकरी
भूसंपादन आणि पर्यावरणविषयक मंजुरी लांबल्यामुळे देशभरात २७० प्रकल्प रखडले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-05-2015 at 04:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay in land acquisition holding up 270 projects nitin gadkari