बलात्काराच्या घटनांनी देश वारंवार हादरत आहे. दिल्लीत देखील पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. पश्चिम दिल्लीत एका १३ वर्षांच्या दलित अल्पवयीन मुलीवर त्यांच्या घरमालकाच्या नातेवाईकाने बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पीडितेच्या पालकांनी नोंदवलेल्या एफआयआरमधून ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या घरमालकाच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे, पोलिसांनी सांगितलं की, आम्ही या प्रकरणात घरमालक आणि त्याच्या पत्नीच्या कथित सहभागाची चौकशी करत आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं कि, आरोपीने पहिल्यांदा आपल्या मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आणि मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव आणला. मात्र, मुलीच्या चेहऱ्यावर आणि खाजगी भागावर गंभीर जखमा होत्या. शवविच्छेदन अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, कुटुंबातीलच एक व्यक्ती असल्याप्रमाणे जवळच्या असलेल्या जमीनमालकाच्या शिफारशीनुसार गेल्या महिन्यात त्यांनी आपल्या मुलीला अटक आरोपी प्रवीणसोबत गुडगाव येथील त्याच्या घरी काम करण्यास पाठवले होते. पीडितेच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं कि, “घरमालकाच्या पत्नीने मला सांगितलं की तिच्या भावाला एक लहान मुलगी आहे आणि माझी मुलगी तिच्याबरोबर खेळू शकते. उरलेला वेळ कुटुंबासोबत राहू शकते. तिने १७ जुलै रोजी माझ्या मुलीला नेलं.”
मुलीच्या वडिलांवर अंत्यसंस्कारासाठी दबाव
पीडितेच्या वडिलांनी पुढे सांगितलं की, “२३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास मला घरमालकाचा फोन आला. ते म्हणाले माझी मुलगी अन्न विषबाधेमुळे मरण पावली आहे. चार तासांनंतर घरमालकाची पत्नी, प्रवीण आणि इतर दोघांनी माझ्या मुलीचा मृतदेह एका खासगी रुग्णवाहिकेतून दिल्लीला आणला.” एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, मुलीच्या वडिलांवर यावेळी अंत्यसंस्कारासाठी दबाव आणला गेला.
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं कि, “त्यांच्याकडे लाकूड आणि पूजेच्या वस्तू होत्या. ते माझ्या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यास तयार होते. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मात्र, आमच्या शेजाऱ्यांनी हे अंत्यसंस्कार थांबवले. त्यांनी आम्हाला माझ्या मुलीच्या शरीराची तपासणी करण्यास सांगितलं. जेव्हा आम्ही मृतदेह पाहिला तेव्हा आम्हाला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर जखमा होत्या. आम्ही कल्पनाही केली नव्हती की ते माझ्या मुलीचा जीव घेतील. आम्ही घाबरलो आणि पोलिसांना बोलवलं.”
पुढे बाबू जगजीवन राम रुग्णालयात करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या पोस्टमार्टमच्या अहवालात असं म्हटलं आहे की, “योनी आणि गुदद्वारासंबंधी लैंगिक अत्याचाराचे पुरावे आहेत आणि सर्व जखमा मृत्यू पूर्वीच्या अगदी जवळच्या कालावधीतील आहेत.”
…तर आम्हाला हा दिवस पाहावा लागला नसता!
पीडित मुलीच्या आईने सांगितलं कि, “घरमालक आणि त्याची पत्नी आमच्याशी खोटे बोलले. आम्ही त्यांचा आदर केला आणि त्यांनी माझ्या मुलीची हत्या केली. त्यांना अटक व्हावी अशी माझी इच्छा आहे. रक्षाबंधनाला मी त्यांना फोन केला आणि विनंती केली की आम्हाला पत्ता द्या जेणेकरून आम्ही आमच्या मुलीला पाहू शकू. पण त्यांनी नकार दिला. ते माझ्या मुलीचं काय करत आहेत हे मला माहीत असतं तर हा दिवस पाहावा लागला नसता.”
पीडित मुलीचे वडील म्हणाले, “मी माझ्या मुलीशी १०-१५ दिवसांपूर्वी शेवटचं फोनवर बोललो होतो. ती जास्त काही बोलली नाही. मी तेव्हा काहीतरी करू शकलो असतो तर खूप बरं झालं असतं.”
POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलगी ही तिच्या तीन लहान भावंड आणि आई -वडिलांसोबत राहत होती. मूळचे बिहारचे रहिवासी असलेले ते भाड्याच्या घरात राहतात. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं कि, “आम्ही कुटुंबाने केलेल्या पीसीआर कॉलचे सर्व तपशील आणि पोस्टमार्टम अहवाल गुडगाव पोलिसांना पाठवला आहे. ह्यात असं आढळून आलं आहे की, या मुलीवर गुडगावमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि तिचा मृतदेह दिल्लीला आणण्यात आला.
एसीपी पश्चिम, गुडगाव, राजिंदर म्हणाले, “पालकांच्या तक्रारीवरून आम्ही प्रवीण आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी दिल्लीच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. आम्हाला त्यांच्याकडून एक अहवाल मिळाला की, मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. आम्ही आता बलात्काराच्या कलमांखाली पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रवीणला अटक करण्यात आली आहे. तर सुरुवातीला गुडगावमध्ये २५ ऑगस्ट रोजी या प्रकरणी खून आणि गुन्हेगारी कट रचणे आणि एससी/एसटी कायद्याखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता.