नवी दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील दुसरा आरोपी प्रदीप याला आज(सोमवार) बिहार येथून अटक करण्यात आली आहे.
प्रदीप याला लखीसराई जिल्ह्यात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड सुनावली आहे त्यानंतर त्याला दिल्लीला आणण्यात येईल असे दिल्ली पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज याने त्याचा मित्र देखील या प्रकरणात सामील असल्याचे सांगितल्यावर दिल्ली पोलिस आणि बिहार पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत प्रदीप याला अटक केली. दिल्लीतील गांधीनगर परिसरात १५ एप्रिल रोजी या दोन नराधमांनी पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिचा जिव घेण्याचा प्रयत्न केला होता. चिमुकलीचा मृत्यू झाला असे समजून तिला तसेच टाकून त्यांनी पळ काढला. परंतु, चिमुकलीचा मृत्यू झाला नव्हता घटनेच्या दोन दिवसांनी चिमुकली तिच्या कुटूंबीयांना सापडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चिमुकलीची प्रकृती आता ठिक आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संतप्त आंदोलकांनी दिल्ली पोलिस मुख्यालय, १० जनपथ आणि इंडिया गेटसह दिल्लीतील इतर रस्त्यावर जोरदार निदर्शनं केली.      

Story img Loader