राजधानी दिल्लीत काय चाललंय? असा प्रश्न सातत्याने होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे पडतो आहे. दिल्लीतल्या सिव्हिल लाईन्स भागात असलेल्या मजनूं का इलाका या परिसरातून एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. ही महिला सफदरजंग भागात राहणारी आहे. ३५ वर्षांच्या या महिलेचं नाव राणी असं आहे. पोलिसांना सपना नावाच्या एका महिलेने फोन करुन या घटनेबाबत माहिती दिली. राणीची हत्या चाकू भोसकून करण्यात आली आहे. सपना नावाच्या महिलेने पोलिसांना सांगितलं की तिच्या घरी काल रात्री पार्टी होती. त्यामध्ये एक मुलगा आणि इतर दोन महिला होत्या. तेवढ्यात काहीतरी वादावादी झाली आणि महिलेवर चाकूचे वार करण्यात आले. या घटनेत या महिलेचा मृत्यू झाला. सपनाने तिचा गुन्हा कबूल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर दिल्ली विभागाचे डीसीपी सागर कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ७ वाजता ३५ वर्षांच्या राणी नावाच्या महिलेचा मृतदेह मजनू का टीला भागातल्या एका छतावर पडलं आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. आम्ही तिथे पोहचलो तेव्हा सपना नावाची एक महिला तिथे उभी होती. तिने सांगितलं की रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा मृतदेह राणी नावाच्या महिलेचा आहे. चौकशी दरम्यान सपनाने तिचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना आणि राणी या दोघी मजनू का टीला भागात एका भाडे तत्त्वावर असणाऱ्या घरात राहतात. राणी गुरुग्राममध्ये एका ब्युटी पार्लरमध्येही काम करत होती. तर सपना ही लग्नांमध्ये
वाढपी म्हणून काम करते. सपनाचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगी आहे.

नेमकी काय घडली घटना?

सोमवारी रात्री उशिरा सपना, राणी, मनिष छेत्री आणि तेनजीन नावाची एक मुलगी यांनी इतर चार-पाच लोकांसह पार्टी केली. पार्टीमध्ये या सगळ्यांनी मद्यपान केलं. याच वेळी राणी आणि सपना या दोघींमध्ये कुठल्याश्या कारणावरुन वाद झाला. रात्री एक वाजता या दोघींनी पुन्हा मद्य प्यायला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा या दोघींमध्ये भांडण झालं. त्याचवेळी सपनाने पहाटे ४.३० च्या दरम्यान स्वयंपाक घरातला चाकू आणला आणि राणीवर एकामागोमाग एक वार केले. त्यानंतर राणीने त्याच ठिकाणी तडफडून प्राण सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यपान केल्यानंतर सपनाने राणीच्या वडिलांबाबत अपशब्द वापरले होते. त्यावरुनच त्यांचं भांडण सुरु झालं होतं.

दिल्लीत २४ तासांत खुनाची दुसरी घटना

दिल्लीत अवघ्या चोवीस तासांमध्ये खुनाची ही दुसरी घटना आहे. सोमवारी दिल्लीच्या शाहबाद डेरी भागात साहिल खान नावाच्या युवकाने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली. तिच्यावर त्याने चाकूने वार केले तसंच दगडाने तिचं डोकं ठेचलं आणि तिला ठार केलं. अत्यंत निर्घृणपणे या मुलीची हत्या कऱण्यात आली. या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावही व्हायरल झाला आहे. अल्पवयीन मुलीला ठार करणाऱ्या साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi a 35 year old woman was stabbed to death her body was found in a blood scj