दिल्लीत रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला कारचालकाने १२ किलोमीटरपर्यंत फरफरट नेलं होतं. तसेच, रस्त्यावर नग्नावस्थेत तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंजली सिंग असं मृत झालेल्या तरुणीच्या नाव आहे. अंजलीचा शवविच्छेदन अहवाल समोर आहे. याबद्दल विशेष पोलीस आयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था ) सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितलं की, “मृत तरुणीचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. शवविच्छेदन अहवालात तरुणीचा मृत्यू रक्तस्त्राव, डोक्याला मारा, पाठीचा कणा मोडल्याने झाला आहे. तिला झालेल्या जखमा या कारने फरफटत नेल्याने झाल्या होत्या. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं नाही,” असं सागर प्रीत हुड्डा यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते,” दिल्ली अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे ‘ते’ ठरले शेवटचे शब्द

अपघातानंतर तरुणीची मैत्रिण गेली घरी

दरम्यान, अपघात होण्यापूर्वी अंजली सिंग आणि तिची मैत्रिण निधी एका हॉटेलमधून पार्टीकरून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर जात असताना कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये अंजलीला १२ किलोमीटर कारने फरफटत नेलं. तर, तिची मैत्रिण निधी गंभीर जखमी झाली होती. त्याच अवस्थेत निधी घरी निघून गेली. याप्रकरणी दिल्ली पोलीस जखमी मैत्रिणीचा जवाब आज ( ३ नोव्हेंबर ) नोंदवणार होते.

हेही वाचा : स्कुटीला धडक दिल्यानंतर १२ किमीपर्यंत फरफटत नेलं, मृतदेह गाडीखाली असतानाही थांबले नाहीत, पाहा व्हिडीओ

दरम्यान, अपघातानंतर पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पाचही आरोपींवर आणखी गुन्हा दाखल करण्यात येतील, असं सागर प्रीत हुड्डांनी सांगितलं. आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल न करता निष्काळीपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi accident no injuries suggestive of sexual assault autopsy report ssa