दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र असून आम आदमी पक्ष दिल्लीचं तख्त पुन्हा राखणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष जवळपास 55 आणि भाजपा 15 जागांवर आघाडीवर आहे. यावरुन भाजपाचा दिल्लीमध्ये पराभव होणार असल्याची चिन्हे दिसताच शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी, भाजपाच्या अहंकाराचा दिल्लीमध्ये पराभव झाला अशी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, महाराष्ट्रात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचा दिल्लीत परिणाम दिसतोय असंही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“दिल्लीतील जनतेने विकासालाच मत दिलं. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणि पर्यायाने भाजपाला नाकारले. हा पराभव म्हणजे भाजपाच्या अहंकाराचा पराभव आहे. भाजपाच्या हातातून आता अनेक प्रदेश निसटले आहेत, वसेनेमुळे देशातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया परब यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. देशद्रोहाचा मुद्दा या निवडणुकीत गाजला. त्यावर अनिल परब म्हणाले की, देशद्रोहाची व्याख्या कोण्या एकाने ठरवून चालत नाही. ती लोकांनीही मान्य करावी लागते. लोकांना काय मान्य आहे, हे लोकांनी आज दिल्लीत दाखवून दिलंय. यासोबतच त्यांनी आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदनही केले.

आणखी वाचा – Delhi Assembly Election 2020: दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारलं – नवाब मलिक

दरम्यान,  दिल्ली पुन्हा एकदा काबीज करण्याचा ठाम विश्वास आपच्या कार्यकर्त्यांना असल्याने दिल्लीतील आपचे कार्यालय सजवण्यात आले आहे. रंगबिरंगी फुगे आणि अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स लावून कार्यकर्ते अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करताना फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे.  तर, मतमोजणीला सुरूवात होईपर्यंत विजयाचा दावा करणाऱ्या भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात, “विजयामुळे आम्हाला गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही” असा संदेश असलेले केंद्रीय  गृहमंत्री अमित शाह यांचे पोस्टर लावण्यात आले आहे.