दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरूवातीचे कल एक्झिट पोलने दर्शवलेल्या आकडेवारीनुसारच आहेत. त्यामुळे जर निवडणूक निकालांमध्ये आम आदमी पार्टीचा विजय झाला तर दिल्लीमध्ये त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनेल, असं झाल्यास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा व्हॅलेण्टाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार बनेल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जर दिल्लीत पुन्हा आपचं सरकार आलं तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करतील, असं झाल्यास दिल्लीचे केजरीवाल पुन्हा एकदा व्हॅलेण्टाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. पण हा केवळ निव्वळ योगायोग असू शकतो की, 2013 आणि 2015 दोन्ही वेळेस दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्हॅलेण्टाईन डे आणि अरविंद केजरीवालांचं कनेक्शन राहिलंय. 2013 मध्ये 4 डिसेंबर रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पाडलं आणि 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले. 2012 नोव्हेंबरमध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली आणि पहिल्यांदा निवडणूक लढताना या पक्षाने 70 पैकी 28 जागा जिंकल्या. तर भाजपाने 31 आणि काँग्रेसने 8 जागा जिंकल्याने विधानसभा त्रिशंकु राहिली. आपने सरकार स्थापनेसाठी कांग्रेससोबत हात मिळवला आणि अरविंद केजरीवाल यांनी 28 डिसेंबर रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण थोड्याच दिवसांमध्ये काँग्रेस आणि आपचे संबंध बिघडले. नंतर केजरीवालांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्यांनी 14 फेब्रुवारी 2014 हा दिवस निवडला. हे सरकार केवळ 49 दिवस चाललं.

यानंतर निवडणूक आयोगाने 12 जानेवारी 2015 रोजी दिल्लीत निवडणुकांची घोषणा केली आणि याच दिवशी आपचे प्रवक्ता राघव चड्ढा यांनी घोषणा केली होती की, “आम्हाला नक्कीच बहुमत मिळेल आणि आमचंच सरकार बनेल. केजरीवाल ऐतिहासिक रामलीला मैदानातून 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील आणि ते दिल्लीचे व्हॅलेण्टाईन बनतील”. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतदान झालं आणि 10 फेब्रुवारी रोजी निवडणुकींचा निकाल जाहीर करण्यात आला आणि आपने सर्वांनाच धक्का देताना 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या व भाजपाला अवघ्या तीन जागांवर रोखलं. पहिल्यांदाच काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. नंतर राघव चड्ढा यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे केजरीवालांनी रामलीला मैदानातून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एका वर्षानंतर केजरीवालांनी या दिवसाचं महत्त्व सांगताना “गेल्यावर्षी याच दिवशी दिल्लीला आपच्या प्रेमात पडली होती. हे कधीही न संपणारं प्रेम आहे”, असं ट्विट केलं होतं. नंतर 2018 मध्ये आप सरकारने 14 फेब्रुवारी रोजी तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजनही केलं होतं.

त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि व्हॅलेण्टाईन डे यांचं कनेक्शन बघता विजयी झाल्यास आप पुन्हा एकदा 14 फेब्रुवारी रोजी शपथग्रहण समारंभ आयोजित करण्याची शक्यता आहे.