दिल्लीतील राजकीय वातावरण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं तापू लागलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, विरोधकांना उत्तर देताना नेत्यांचं भान सुटत असल्याचं समोर येऊ लागलं आहे. दिल्लीला शाहीन बागेतून सोडवायचं असेल, तर कमळाचं बटण दाबा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अजबच आवाहन मतदारांना केलं आहे. “सर्व मतदानांसाठी जावं आणि इतक्या वेळा झाडूचं बटण दाबावं की, बटण खराब झालं पाहिजे,” असं केजरीवाल म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत सभा झाली. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले,”पुन्हा एकदा राजकारण बदलण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आठ फेब्रुवारीला सर्व लोकांनी जावे आणि झाडूचं बटण दाबावं. इतकं बटण दाबा, इतकं बटण दाबा की, बटणच खराब झालं पाहिजे,” असं केजरीवाल म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उत्तर देताना केजरीवाल म्हणाले,”अमित शाह त्यांच्या भाषणात म्हणाले की, कुठेही सीसीटीव्ही दिसले नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या सभेचं सीसीटीव्ही फुटेज पाठवण्यात आलं. आमच्या सरकारनं दोन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. अमित शाह यांच्याकडे निर्भया निधी आहे. त्यांनीही दिल्ली सरकारचं अनुकरण करावं,” असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीवाले कोणाचे कान ओढत नाही –

“अमित शाहजी तुम्ही दिल्लीला जागतिक दर्जाचं शहर बनवू इच्छिता. दिल्लीच्या लोकांनाही हेच हवं आहे. तुमचा हा निवडणुकीपुरता जुमला नसेल तर मी दिल्लीतील नागरिकांच्या वतीनं ग्वाही देतो की आपण सगळे मिळून हे करूया. कृपा करून नंतर भूमिका बदलू नका. दिल्लीचे लोक खूप चांगले आहे. ते कोणाचेही कान ओढत नाहीत,” असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.

Story img Loader