Delhi Vidhan Sabha Election 2020 Result Live Updates :दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच आम आदमी पार्टी ५० जागांपेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा काबीज करण्याचा ठाम विश्वास आपच्या कार्यकर्त्यांना असल्याने दिल्लीतील आपचे कार्यालय सजवण्यात आलं आहे. रंगबिरंगी फुगे आणि केजरीवाल यांचे पोस्टर्स लावून कार्यकर्ते अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.
Delhi: Aam Aadmi Party office decked up ahead of #DelhiElectionResults. https://t.co/No8TVk27nO pic.twitter.com/KKQcdrRFNv
— ANI (@ANI) February 11, 2020
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करताना फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे. मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये देखील आपचं पारड जड दाखवण्यात आल्याने आपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
#DelhiElections2020: An Aam Aadmi Party (AAP) supporter reaches Delhi Chief Minister Arvind Kejriwal’s residence with his children. Counting for all 70 assembly seats in Delhi to begin at 8 am. pic.twitter.com/jFG9M6VZ4W
— ANI (@ANI) February 11, 2020
केजरीवाल यांच्या घरी विजयाची तयारी सुरू
मतमोजणीला सुरूवात होण्याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी विजयोत्सवाची तयारी सुरू झाली होती. कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपल्या लहान मुलांसह गर्दी करण्यास सुरूवात केली होती. या चिमुकल्यांनी केजलीवालांचा वेश परिधान केला आहे.