Delhi Vidhan Sabha Election 2020 Result Live Updates : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (११ फेब्रुवारी) जाहीर झाले. भाजपा आणि आप अशी थेट लढत निकालात बघायला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करत भाजपानं ‘आप’ला आव्हान दिलं. मात्र, ‘आप’नं विकासाचा मुद्दा दिल्लीकरांच्या समोर मांडत भूमिका कायम ठेवली. त्याचे परिणाम निकालात दिसून आले. दिल्लीच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य “आप’च्या झोळीत घसघशीत मतं टाकली. त्यामुळे ‘आप’नं भाजपा आणि काँग्रेसला आस्मान दाखवत मोठा विजय संपादन केला. ७० जागांपैकी ६३ जागा आपनं जिंकल्या, तर भाजपानं सात जागांवर विजय संपादन केला.

Maharashtra Live News
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “नाशिकमध्ये आयटी पार्क आणेन”, राज ठाकरेंचं नाशिककरांना आवाहन!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री
Bhokar Assembly Election 2024 SriJaya Chavan
Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण विरुद्ध तिरुपती कोंढेकरांमध्ये अटीतटीची लढत; भोकरमध्ये कोणाचं पारडं जड?
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
Maharashtra Assembly Election 2024 : “महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळल्याने चांगलं सर्वेक्षण दाखवलं”, रोहित पवारांचा चिमटा

Live Blog

17:13 (IST)11 Feb 2020
दिल्लीत राष्ट्रवादीची 'नोटा'च्याही तुलनेत कामगिरी सुमार

दिल्लीत आपलं संघटन उभं करण्यासाठी चार उमेदवार दिले असल्याचे पवार यांनी या निकालानंतर सांगितलं. पण, हे चारही उमेदवार मतदारांवर फारसा करिष्मा करू शकले नाहीत. सविस्तर इथे वाचा...Delhi Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदावारांनी सपाटून खाल्ला मारhttps://t.co/GkCLS4E1r5 via @LoksattaLive राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या चाचणी परीक्षेत ‘नापास’ झाला आहे...#DelhiResults #DelhiElectionResults #DelhiElections2020 #NCP #SharadPawar— LoksattaLive (@LoksattaLive) February 11, 2020

16:49 (IST)11 Feb 2020
"वाढदिवसाला मिळालेलं आतापर्यंतच सर्वात मोठं गिफ्ट"

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ते उत्साहात आहेत. सगळीकडं गुलालाची उधळण करत कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहे. योगायोग म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. 'आप'ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आतापर्यंतचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. हा सत्याचा विजय झाला आहे. मूळ प्रश्नांवर राजकारण करायला हवं. राजकीय पक्षांनी यातून शिकलं पाहिजे," असं सुनिता केजरीवाल म्हणाल्या.

15:02 (IST)11 Feb 2020
नायब राज्यपालांकडून दिल्ली विधानसभा बरखास्त

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली विधानसभा बरखास्त केली. आता निकालानंतर नवीन विधानसभा गठित केली जाईल. 

14:59 (IST)11 Feb 2020
कडव्या झुंजीनंतर मनिष सिसोदिया विजयी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पटपडगंज मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे मधल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडले होते. तब्बल दोन हजार मतांनी मागे असलेल्या सिसोदिया यांनी अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये पुन्हा आघाडी घेत विजय संपादन केला.

14:05 (IST)11 Feb 2020
ग्रेटर कैलाशमधून सौरभ भारद्वाज विजयी

ग्रेटर कैलाश मतदारसंघातून आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज विजयी झाले आहेत. आपचा दुसरा उमेदवार विजयी झाला आहे. राजेंद्रनगर मतदारसंघातून राघव चढ्ढा विजयी झाले. त्यांनी भाजपाचे उमेदवार आरपी सिंह यांचा पराभव केला.

13:51 (IST)11 Feb 2020
पहिला निकाल; राजेंद्रनगरमधून आप उमेदवार विजयी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. राजेंद्रनगर विधानसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार राघव चढ्ढा विजयी झाले आहेत. दुसरीकडं उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. पटपडगंज मतदारसंघातून ते ७७९ मतांनी पुढे आहेत.

13:49 (IST)11 Feb 2020
दिल्लीत भाजपाचे तीन-तेरा; केजरीवालांच्या 'झाडू'नं काँग्रेस साफ

एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागां वाढल्या आहेत. मात्र, भाजपाकडून करण्यात आलेला दावा फोल ठरला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तीन जागा जिंकलेली भाजपा सध्या १३ जागांवर आघाडीवर आहे. तर आपच्या झंझावातात काँग्रेसचा दिल्लीतून पुन्हा एकदा सफाया झाला आहे. सध्या आप ५७ जागांवर आघाडीवर आहे. 

13:38 (IST)11 Feb 2020
कष्ट घेतले, पण यश मिळालं नाही; काँग्रेसनं पराभव स्वीकारला

निकालानंतर जनतेनं दिलेला जनादेश मान्य असल्याचं सांगत काँग्रेसनं पराभव स्वीकारला आहे. "या पराभवानं काँग्रेस हाताश झालेली नाही. यापुढील काळातही काँग्रेस दिल्लीच्या विकास लक्ष ठेवेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले. तरीही अपयश आलं. मात्र, प्रत्येक निवडणूक शिकवत असते. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये या पराभवामुळे नाराजी नाही. विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन," असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

12:59 (IST)11 Feb 2020
केजरीवाल आघाडीवर, सिसोदिया पिछाडीवर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपाच्या उमेदवाराला मात देत केजरीवाल यांनी आघाडी कायम ठेवली आहे. मात्र, त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचा उमेदवार दोन हजार मतांनी आघाडीवर आहे. सध्या 'आप' ५६ जागांवर आघाडीवर आहे.


12:18 (IST)11 Feb 2020
भाजपाची पुन्हा घसरण; 'आप'नं घेतली झेप, ५८ जागांवर आघाडी

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीबरोबर आकडे बदलत असून, २० जागांवर आघाडी घेतलेल्या भाजपाची पुन्हा घसरण झाली आहे. भाजपा सध्या १२ जागांवर आघाडीवर असून, 'आप'नं पुन्हा उभारी घेत ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. 

11:58 (IST)11 Feb 2020
शाहीन बाग; अमानतुल्लाह खान ६५ हजार मतांनी आघाडीवर

सीएए आणि एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात चर्चेत राहिले. शाहीन बाग आंदोलनावरून भाजपानं आप व काँग्रेसवर निशाणा साधला होता. शाहीन बाग ओखला विधानसभा मतदारसंघात येतं. या ठिकाणी "आप'चे उमेदवार अमानतुल्लाह खान हे आघाडीवर आहेत. भाजपाचे उमेदवार ब्रह्म सिंह यांच्याविरोधात त्यांनी ६५ हजार ५४६ मतांनी आघाडी घेतली आहे.

11:44 (IST)11 Feb 2020
मुंबईत आप कार्यकर्त्यांचा जल्लोष

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' पुन्हा सत्तेत येत आहे. या निकालामुळे मुंबईतील 'आप' कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. कार्यकर्त्यांनी गाण्यावर ठेका धरत जल्लोष केला.

11:24 (IST)11 Feb 2020
मनिष सिसोदिया पिछाडीवर

पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर आहेत. या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रवि नेगी यांनी १,४२७ मतांची आघाडी घेतली आहे. 

11:04 (IST)11 Feb 2020
"आमचा विजय सिद्ध करेल, खरे देशभक्त लोकांसाठी काम करतात"

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही फेऱ्या पार पडल्या असून, 'आप' पुन्हा एकदा सत्तेत येत आहे. दिल्लीकरांनी सलग तिसऱ्यांदा 'आप'ला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं आहे. निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. सिसोदिया म्हणाले,'आमचा विजय हे सिद्ध करेल की, खऱ्या देशभक्तांना राजकारणात येण्याची संधी मिळाली तर ते लोकांसाठी काम करतात. आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे,' असं सिसोदिया यांनी सांगितलं.

मतमोजणी केंद्राबाहेर मनिष सिसोदिया.

10:55 (IST)11 Feb 2020
Video विश्लेषण : केजरीवालांनी दिल्ली विधानसभा पुन्हा कशी काबीज केली

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/705Xv9TX0bA" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

10:28 (IST)11 Feb 2020
केजरीवालांचं मताधिक्य घटलं

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये केजरीवाल यांनी भाजपाचे उमेदवार सुनील कुमार यादव आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश सबरवाल यांच्याविरोधात २० हजारांनी आघाडीवर होते. त्यांचं मताधिक्य घटलं असून, केजरीवाल सध्या चार हजार मतांनी पुढे आहेत.

10:23 (IST)11 Feb 2020
जो निकाल लागेल, त्याला मी जबाबदार -मनोज तिवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे जे कल येत आहे. त्यात भाजपा आणि आपमध्ये तफावत दिसत आहे. पण, अजून वेळ आहे त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. जे काही निकाल येतील त्याला मी जबाबदार असेल," असं भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.

10:18 (IST)11 Feb 2020
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आघाडीवर

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपानं रविंदर सिंह नेगी यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसचे लक्ष्मण रावत हे सिसोदिया यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडं भाजपाचे कपिल मिश्रा मॉडेल टाऊन मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

10:00 (IST)11 Feb 2020
केजरीवाल होणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. आपला स्पष्ट बहुमत मिळत असून, केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत. सध्या आप ५१ जागांवर, भाजपा १९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागणार आहे. 

09:38 (IST)11 Feb 2020
केजरीवाल २० हजार मतांनी आघाडीवर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भाजपानं सुनील कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं रोमेश सबरवाल यांना मैदानात उतरवलं आहे. केजरीवालांनी दोन्ही उमेदवारांना मागे टाकलं आहे. मतमोजणीच्या सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये केजरीवाल यांनी तब्बल २० हजार मतांची आघाडी घेतली आहे.

09:27 (IST)11 Feb 2020
शाहीन बाग किस के साथ?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बागमधील आंदोलन भाजपानं मुख्य मुद्दा बनवला होता. राष्ट्रवादाच्या मुद्यावर भाजपानं 'आप'ला लक्ष्य केलं. त्यामुळे शाहीन बाग असलेल्या ओखला मतदारसंघामधून कोण आघाडीवर आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सविस्तर वृत्त इथे...

09:18 (IST)11 Feb 2020
सेलिब्रेशनसाठी 'आप'चं कार्यालय सज्ज

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्व कौल हाती आले असून, दिल्लीकरांनी पुन्हा 'आप'ला सत्तेत बसवलं आहे. प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपाला अपयश आलं आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा पराभव येणार असल्याचं दिसत आहे. कौल हाती आल्यानंतर 'आप'चं कार्यालय सज्ज झालं आहे. 

आम आदमी पक्ष कार्यालय

09:04 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : काँग्रेसचं खात उघडलं

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अखेर काँग्रेसचं खातं उघडलं आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये लढत होत असताना काँग्रेस मात्र शून्यावरच होती. काही फेऱ्या पार पडल्यानंतर काँग्रेसनं खात उघडलं आहे. एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर आप ५३ जागांवर आघाडीवर आहे. भाजपानं १६ जागांवर आघाडी घेतली आहे.

08:44 (IST)11 Feb 2020
'आप'ची फिफ्टी; भाजपाचा गाडा १३ जागांवर अडला

मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांतच आम आदमी पार्टीनं ५० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा अजूनही १३ जागांवरच आघाडीवर आहे. सुरूवातीचे कल हाती आल्यानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. पक्ष कार्यालयासह सर्वत्र जल्लोषाचं वातावरण असून, भाजपाच्या कार्यालयांमध्ये अद्याप शुकशुकाट दिसत आहे. 

08:33 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : 'आप'ची जोरदार मुसंडी; काँग्रेसला खातं उघडण्याची प्रतीक्षा

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल हळूहळू समोर येऊ लागले आहेत. निवडणुकीच्या सुरूवातीपासूनच दिल्लीतल्या सत्तेविषयी व्यक्त करण्यात येत असलेले अंदाज सुरूवातीच्या कलातून दिसून येत आहे. आम आदमी पक्षानं जोरदार मुसंडी मारली आहे. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये 'आप'नं ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा १३ जागांवर पुढे आहे. काँग्रेसकडं मात्र, दिल्लीकरांना सपशेल पाठ फिरवली आहे. काँग्रेस अजूनही शून्यावरच आहे.

08:15 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : 'आप'ची 32 जागांवर आघाडी; भाजपा पिछाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीचे पहिले कल हाती आले असून, एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे 'आप'नं मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 32 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर असून भाजपानं दहा जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसनं अजून भोपळाही फोडलेला नाही.

08:12 (IST)11 Feb 2020
केजरीवालांना कोण देणार टक्कर; यादव की सबरवाल?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भाजपानं सुनील कुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं रोमेश सबरवाल यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे केजरीवाल यांना कोण टक्कर देणार याकडे दिल्लीसह देशाचं लक्ष आहे.

07:41 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : 'एबीपी-सी व्होटर्स'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत आप

एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलनुसार आपचीच दिल्लीत पुन्हा सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आपला ५० ते ६३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. तर भाजपाला ५ ते १९ जागा मिळतील असा दावा एक्झिट पोलनं केलेला आहे. मागील निवडणुकीत शून्यात राहिलेल्या काँग्रेसला ४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

07:36 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि आप हेच दोन प्रमुख पक्षांनी प्रचाराच मैदान गाजवलं. पंधरा वर्ष दिल्लीच्या सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची मरगळ मात्र, कायम दिसली. पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अखेरच्या टप्प्यात काही सभा घेतल्या. निवडणुकीत काँग्रेस फार प्रभावी ठरले नाही. त्यामुळे हरयाणाप्रमाणेच काँग्रेसला चमत्काराची आशा आहे. हरयाणामध्ये एग्झिट पोलमध्ये काँग्रेस तीन-चार जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, काँग्रेसनं ३१ जागांवर विजय मिळवला होता.

07:24 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : "भाजपानं ५५ जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही"

मतमोजणीला सुरूवात होण्यापूर्वी भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. "मी निराश नाही. भाजपासाठी आजचा दिवस खूप चांगला ठरणार आहे, याबद्दल मला विश्वास आहे. भाजपानं ५५ जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही," असं तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

07:18 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : केजरीवालांच्या घरी विजयाची तयारी सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला तासाभरात सुरूवात होणार आहे. मात्र, मतमोजणीला सुरूवात होण्याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच केजरीवाल यांच्या निवासस्थानी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे विजयाचा आनंद साजरा करताना कार्यकर्त्यांनी फटाके फोडू नये असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.

06:43 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : ४८ जागा जिंकणार; भाजपाचा दावा खरा ठरणार का?

दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्ष सत्तेवर येणार असल्याचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. मात्र, ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या भाजपाने सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दिल्लीत ४८ जागा जिंकणार, असा विश्वास दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी मतदानानंतर व्यक्त केला होता. त्यामुळे एग्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात की, भाजपानं केलेला हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे. 

06:40 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : दिल्लीत पुन्हा आप; भाजपाच्या पदरात निराशा?

दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपाकडून प्रचंड प्रतिष्ठेची करण्यात आली. 'आप'च्या विकासाच्या मुद्याला उत्तर देण्यासाठी भाजपानं राष्ट्रवादाचं अस्त्र उगारलं. मात्र, ते अपयशी ठरणार असल्याचे अंदाज मतदानपूर्व आणि मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आले आहेत. 'आप'ला काही प्रमाणात फटका बसणार असल्याचं काही एग्झिट पोलनं म्हटलं आहे. मात्र, सत्ता 'आप'कडेच राहणार असून, भाजपाच्या पदरी पुन्हा परावभच पडणार असल्याचंही या चाचण्यांच्या आकड्यातून दिसत आहे.

06:33 (IST)11 Feb 2020
Delhi Elections Result : आप कार्यकर्त्यांचा स्ट्राँगरूम बाहेर कडा पहारा

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वी 'आप'च्या कार्यकर्त्यांकडून मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमवर लक्ष ठेवण्यात आलं. सोमवारी रात्री 'आप'चे उमेदवार अमानतुल्ला खान यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराणी बागेतील मिराबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या स्ट्राँगरूम बाहेर रात्रभर कडा पहारा दिला. 

06:28 (IST)11 Feb 2020
Delhi Assembly Election 2020 Result : ७० जागा ६७२ उमेदवार

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले. ७० जागांसाठी ६७२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. २७ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली आंदोलने आणि निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.