पीटीआय, नवी दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणुकांना दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी रविवारी तिसरा आणि अंतिम जाहीरनामा प्रसिद्ध केला. तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे, १७०० अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क प्रदान करण्याचे तसेच गिग कर्मचारी आणि मजुरांसाठी कल्याणकारी योजना सादर करण्याचे आश्वासन दिले.

भाजप सत्तेवर आल्यास, १७०० अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना मालमत्तांचे पूर्ण मालकी हक्क मिळतील आणि विक्री, खरेदी आणि बांधकामाचा मार्ग मोकळा होईल असे शहा यांनी सांगितले. तसेच गरिबांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना थांबवणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

विश्वासघात करणाऱ्यांपासून सुटका करणे हा निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे शहा म्हणाले. दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.

आश्वासनांची खैरात

राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना दिल्ली मेट्रोमध्ये वार्षिक ४,००० रुपयांपर्यंत मोफत प्रवास

● ‘गिग वर्कर्स वेल्फेअर बोर्ड’ स्थापन करणार, १० लाख रुपयांचा विमा आणि ५ लाख रुपयांचे अपघात संरक्षण

५०,००० सरकारी पदे पारदर्शक पद्धतीने भरणार

२० लाख स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणार

Story img Loader