Delhi Assembly Session 2025 CM Rekha Gupta : दिल्लीत भाजपाने ४८ जागी विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. दरम्यान २७ फेब्रुवारीपर्यंत विशेष अधिवेशन असणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान आप म्हणजेच आम आदमी पार्टीच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. ज्यानंतर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी आपच्या १२ आमदारांचं निलंबन केलं आहे. दरम्यान दिल्ली विधानसभेत कॅगचा अहवाल सादर झाला आहे. या अहवालात शीशमहल, मद्य घोटाळा याबाबत महत्त्वाचे उल्लेख आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे.अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना शीशमहल वर करोडो रुपये खर्च करण्यात आल्याचा उल्लेख या अहवालात आहे. तसंच मद्य धोरणामुळे हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जाणून घेऊ यासंदर्भातल्या घडामोडी
Delhi Assembly Session 2025 LIVE : 'शीशमहल', मद्य घोटाळ्याशी संबंधित कॅगचा अहवाल दिल्ली विधानसभेत सादर, यासह महत्त्वाच्या घडामोडी
तज्ज्ञांच्या समितीच्या अहवालाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं, कॅगच्या अहवालात आपच्या सरकारवर ठपका
आम आदमी पक्षाला मद्य धोरण बदलण्यापूर्वी काही तज्ज्ञांनी महत्त्वाचे सल्ले दिले होते. मात्र त्यातला कुठलाही सल्ला विचारांत घेतला गेला नाही. तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालाकडे डोळेझाक करण्यात आली. असंही कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
कॅगच्या अहवालात मद्य धोरणाबाबत काय काय मुद्दे मांडले गेले आहेत?
कॅग अहवालातले ठळक मुद्दे काय?
नव्या महसूल धोरणामुळे दिल्ली सरकारला २००० कोटींचं नुकसान झालं
नव्या मद्य धोरणाच्या आधी एका व्यक्तीला एकच परवाना मिळत होता. नव्या धोरणानुसार एक व्यक्ती दोन डझन परवाने घेण्यास पात्र होता.
दिल्लीत नव्या मद्य धोरणाच्या आधी ६० टक्के मद्य विक्री ही चार सरकारी कॉर्पोरेशनद्वारे केली जात होती. नव्या धोरणानंतर खासगी कंपन्यांनी विक्री परवाने घेतले.
मद्य विक्रीचं कमिशन ५ वरुन १२ टक्के करण्यात आलं.
परवाने देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती, कंपनीची आर्थिक आणि गुन्हे नोंद आहेत का याची माहिती घेण्यात आली नाही.
अरविंद केजरीवाल सरकारच्या मद्यधोरणात २००२ कोटी बुडाले, CAG चे ताशेरे; मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी मांडला अहवाल!
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या बहुमतानंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं, तर आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे दिल्लीत 'आप' विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत विशेष अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यालयामधून शहीद भगतसिंग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हटवल्याचा दावा विरोधी पक्षनेत्या अतिशी यांनी केला. यावरून चांगलंच राजकारण तापलं. यातच आज (२५ फेब्रुवारी) दिल्ली सरकारने कॅगचा अहवाल विधानसभेत सादर केला आहे. या अहवालात ‘आप’ सरकारच्या कारभाराच्या संदर्भात मोठा खुलासा करण्यात आला आहे.
कॅगच्या अहवालात काय उल्लेख करण्यात आला आहे?
दिल्ली विधानसभेत कॅगचा जो अहवाल सादर झाला त्या कॅगच्या अहवालात असं म्हणण्यात आलं आहे की मद्य धोरणामुळे दिल्ली सरकारचं २ हजार कोटींहून अधिक नुकसान झालं. स्थानिक परवान्यांमध्ये सूट दिली गेल्याने ९४१ कोटींचं नुकसान झालं. तर निविदा न काढल्याने सुमारे ८९० कोटींचं नुकसान झालं.
भाजपावर विरोधी पक्षनेत्या आतिशी यांचा गंभीर आरोप
"भाजपाने त्यांचा खरा चेहरा संपूर्ण देशाला सोमवारी दाखवला. दिल्ली विधानसभा आणि दिल्ली सचिवालय या ठिकाणी असलेल्या मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर कार्यालयांमध्ये असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हटवून त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. भाजपाच्या लोकांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात त्यामुळेच हे करण्यात आलं."
आपच्या १२ आमदारांचं विधानसभा अध्यत्रांनी केलं एक दिवसासाठी निलंबन
दिल्लीचे उपराज्यपाल वी. सक्सेना यांचं भाषण सुरु असताना आम आदमी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. ज्यानंतर विधासभेच्या अध्यक्षांनी विधासभेच्या विरोधी पक्ष नेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन केलं. हे निलंबन २४ तासांसाठी करण्यात आलं आहे.
आपच्या १२ आमदारांचं निलंबन, आतिशी यांचाही समावेश (फोटो-ANI)
दिल्लीत भाजपाने ४८ जागी विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. दरम्यान २७ फेब्रुवारीपर्यंत विशेष अधिवेशन असणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान आप म्हणजेच आम आदमी पार्टीच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. ज्यानंतर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी आपच्या १२ आमदारांचं निलंबन केलं आहे.