Delhi Blast Near CRPF School : दिल्लीमधील रोहिणी परिसरातील प्रशांत विहार परिसरात सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. हे चित्र पाहून रोहिणी परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रोहिणीचे पोलीस पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की आम्ही या स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी काही तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केलं आहे. हा स्फोट कशाचा होता ते अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र आम्ही या परिसरात पोलीस बंदोबस्त केला आहे. पोलिसांची मोठी तुकडी या परिसरात तैनात करण्यात आली आहे. तज्ज्ञांचं पथक तपासाअंती या प्रकरणाची माहिती देईल.

baba siddique murder case
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: जुहू बीचवर काढलेल्या ‘त्या’ फोटोमुळे आरोपी अडकले; तिसऱ्या फरार साथीदाराचीही ओळख पटली!
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnaw : मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वेमंत्री म्हणाले, “आम्ही पुढील पाच वर्षांत…”
Cm Eknath Shinde at davos
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यात १.५८ कोटींची उधारी, कंपनीनं पाठवली कायदेशीर नोटीस
sanjay raut allegation on amit shah
Sanjay Raut : “…तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील”, संजय राऊतांचा गंभीर आरोप!
pakistani family arrest in bengaluru
पाकिस्तानचं सिद्दीकी कुटुंब ‘शर्मा’ बनून भारतात का आले? मुस्लीम असूनही शेजारी देश सोडण्याचं खरं कारण काय?
Ajit Pawar On Amit Shah Statement
Ajit Pawar : अमित शाहांच्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “राज्यात एका पक्षाचं सरकार सत्तेत…”
Ratan Tata Last rites
Ratan Tata Death : अखेरचा सलाम! उदार अंत:करणाच्या उद्योजकाला निरोप देताना महाराष्ट्रासह देशही हळहळला

हे ही वाचा >> Lawrence Bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोईच्या कुटुंबाकडे शेकडो एकर जमीन, त्याच्यावर वर्षाला करतात ३५ लाखांचा खर्च’, लॉरेन्सच्या भावाने दिली धक्कादायक माहिती

सकाळी ७.५० वाजता स्फोट झाला

स्थानिकांनी सकाळी ७.५० च्या सुमारास अग्निशमन दलाला या स्फोटाची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची दोन वाहनं घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. तिथे कुठेही आग लागल्याचं किंवा इमारतीचं नुकसान झालेलं नसल्याचं निदर्शनास आलं. अग्निशमन दलाचं पथक संपूर्ण परिसर पिंजून काढत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असावा असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, हा सिलेंडर स्फोट नसल्याचं तपासात उघड झालं आहे. तसेच पोलीस या भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.