दिल्ली प्रौद्योगिकी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या चेतन कक्कड याला गूगलने तब्बल १.२७ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. याच विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला याआधी ९३ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. त्यापेक्षा जास्त पॅकेज चेतन कक्कडला मिळाल्याने विद्यापीठासाठी नवा इतिहासच रचला गेला आहे.
चेतनचे आई आणि वडील दोघेही दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. चेतन माहिती-तंत्रज्ञान या विषयातून बी-टेक ही पदवी मिळवणार आहे. कॅम्पसमधूनच त्याची गूगलसाठी निवड झाली. त्याच्या या यशाने त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईक आनंदित झाले आहेत. मुलाने जे स्वप्न बघितले होते, ते पूर्ण केले असे त्याची आई रिता कक्कड यांनी सांगितले. पुढील वर्षी अंतिम परीक्षा दिल्यावर चेतन गूगलच्या कॅलिफोर्नियातील कार्यालयात रुजू होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in