दिल्लीतल्या आऊटर सुल्तानपुरी भागातली काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अॅक्टिव्हावरून जाणाऱ्या एका मुलीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या मुलीला ज्या कारने धडक दिली त्या कारने चार किमी फरफटवलं. ज्या मुलीचा अपघात झाला तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. या २३ वर्षांच्या मुलीवर घराची जबाबदारी होती. मात्र आता या मुलीचा विचित्र आणि तेवढ्याच भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ANI ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
समोर आलेल्या माहितीनुसार या वडील गेल्यानंतर घराची सगळी जबाबदारी या मुलीवरच येऊन पडली होती. सध्या ही तरूणी एका इव्हेंट कंपनीत काम करत होती. तिच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या आईला धक्का बसला आहे तसंच घरातल्या इतर सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मुलीचं घर दिल्लीतल्या अमन विहारमध्ये आहे. या मुलीच्या घरात आई आणि चार बहिणी आहेत. तसंच दोन लहान भाऊही आहेत. तिचा एक भाऊ १३ वर्षांचा तर दुसरा भाऊ ९ वर्षांचा आहे. या मुलीच्या वडिलांचा मृत्यू ८ वर्षांपूर्वी झाला. तर या मुलीच्या एका बहिणीचं लग्न झालं आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. तसंच या मुलीच्या आईच्या दोन्ही किडनी बिघडल्या आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.
कारने मुलीला चार किलोमीटर फरफटवलं
राजधानी दिल्लीत ३१ डिसेंबरच्या दिवशी ही घटना घडली. या मुलीला ज्या कारने धडक दिली त्या कारने तिला चार किलोमीटर फरफटवलं. या घटनेत मुलीच्या शरीरावर असलेले सगळे कपडे फाटले. तसंच तिच्या शरीरावर अनेक जखमाही झाल्या. हा अपघात एवढा भीषण होता की या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. या मुलीच्या मृतदेहाची अवस्थाही छिन्नविछिन्न झाली आहे.तिचा फोटोही बघण्याच्या अवस्थेतला नाही. दिल्लीच्या फॉरेन्सिक विभागाची टीम कार आणि स्कुटी यांची तपासणी करण्यासाठी सुल्तानपुरी पोलीस ठाण्यात पोहचली आहे.
कुटुंबीयांनी काय म्हटलं आहे?
३१ डिसेंबरच्या दिवशी आपल्या स्कुटीवर ही मुलगी निघाली होती. तिला तिच्या इव्हेंट कंपनीत काम होतं. संध्यकाळी ६ वाजता या मुलीने घर सोडलं. त्यानंतर तिने रात्री ९ वाजता फोन केला आणि सांगितलं की मला घरी यायला थोडा उशीर होणार आहे. हा तिच्यासोबत झालेला शेवटचा संपर्क होता. त्यानंतर सकाळी ८ वाजता पोलिसांनी तिच्या कुटुंबाला या भीषण अपघाताची आणि मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
“आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते,” दिल्ली अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे ‘ते’ ठरले शेवटचे शब्द
मुलीच्या शरीरावर असलेले सगळे कपडे फाटले
मुलीला ज्या कारने धडक दिली ती कार या मुलीला स्कूटरसकट चार किमी फरफटवलं त्यामुळे तिच्या अंगावरचे सगळे कपडे फाटले. तिच्या शरीरावर जखमा झाल्या. दिल्ली पोलिसांनी हा विचित्र अपघात असल्याचं म्हटलं आहे. मात्र या मुलीच्या अपघात स्थळावरचा जो फोटो समोर आला आहे तो फोटो कुणीही पाहण्यासारखा नाही इतका भीषण आहे. तिचं शरीर छिन्नविछिन्न झालं होतं. तसंच तिचे दोन्ही पायही कापले गेले होते.
दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं आहे?
दिल्ली आऊटरचे डिसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितलं की पोलिसांनी कारच्या नंबरवरून आरोपींना अटक केली आहे. पीडिता स्कुटीसकट जखमी झाल्यानंतर या सगळ्यांनी तिथून पळ काढला होता.