नवी दिल्ली : हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या महान देशातील चौथी पास राजा अहंकारी होताच शिवाय तो भ्रष्टाचारीही होता, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणाचेही नाव न घेता केली. मद्यधोरणातील कथित घोटाळा प्रकरणी ‘सीबीआय’च्या चौकशीनंतर सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करून आम आदमी पक्षाने शक्तिप्रदर्शन केले.

केजरीवाल यांची रविवारी सीबीआयने नऊ तास चौकशी केली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. माहितीच्या अधिकारात मोदींच्या पदवीची माहिती विचारली होती. त्याचा संदर्भ विधानसभेतील भाषणात देत केजरीवाल म्हणाले,’ राजाने ‘एमए’ पदवी घेतल्याचा दावा केला होता. त्यासंदर्भात लोकांनी ‘आरटीआय’द्वारे माहिती मागितली तर त्यांना २५ हजारांच्या दंडाची शिक्षा झाली!

devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis should become heir of pm Narendra Modi and lead country says vijay wadettiwar
मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करा… वडेट्टीवारांच्या फडणवीसांवरील स्तुतीसुमनांमुळे…
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर
Ramesh Bidhuri vs cm atishi marlena
Ramesh Bidhuri: ‘तिने तर बापच बदलला’, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यानंतर भाजपा नेते रमेश बिधुरींचे मुख्यमंत्री आतिशींबाबत अश्लाघ्य विधान
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका
aam aadmi party is disaster
आप नव्हे आपदा, पंतप्रधानांचे दिल्लीतील कार्यक्रमात टीकास्त्र
PM Modi Speaking In Delhi.
PM Modi : “अण्णा हजारेंना पुढे करत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले”, विधानसभेच्या तोंडावर पंतप्रधानांकडून ‘आप’वर टीका

प्रचंड टोलेबाजी

वीस मिनिटांच्या भाषणात केजरीवाल यांनी प्रचंड टोलेबाजी केली. ‘या राजाने नोटबंदी केली, देशात हाहाकार माजला. देश वीस-पंचवीस वर्षे मागे गेला. मग, या अशिक्षित राजाने कृषि कायदे संमत केले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हुळहळू देशातील समस्या वाढत गेल्या. राजाला वाटले पैसे तर कमवले पाहिजेत. राजाने मित्राला सगळी सरकारी कंत्राटे दिली. राजाचे पैसे, मित्राचे काम अशा रितीने दोघांनी मिळून देशाला प्रचंड लुटले. मग, त्यांनी देशच विकत घेतला. त्यामुळे महागाई भडकली, त्यात लोक होरपळले. लोकांनी विरोध करताच त्यांची रवानगी तुरुंगात केली, असे टोमणे हाणले. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दिल्ली विधानभवनाबाहेर जोरदार निदर्शने केली.

Story img Loader