दिल्ली सरकारने कोविड १९ च्या काळात मृत्यूमुख पडलेल्या पाच करोनो योद्ध्यांच्या प्रत्येक कुटुंबाला १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फार्मासिस्ट संजय मनचंदा यांचं कुटुंबिय, मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील कनिष्ठ सहाय्यक रवी कुमार सिंग, स्वच्छता कर्मचारी वीरेंद्र कुमार, दिल्लीचे पोलीस अधिकारी भावनी चंद्रा आणि प्राथमिक शिक्षक मोहम्मद यासेन यांच्या कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. या पाचही लोकांनी साथीच्या आजारात जीवाची बाजी लावत सेवा बजावली होती.

जाहीर झालेल्या मदतीमुळे कुटुंबाचं नुकसान भरून निघणार नाही. परंतु, यामुळे ते निदान सन्मानाने जगू शकतील, असं मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या. दिल्लीतील करोना योद्धांनी महामारीच्या काळात मानवतेचे आणि समाजाचे रक्षण केले. स्वतःच्या जीवाचा विचार न करता प्राणांची आहुती दिली. दिल्ली सरकार त्यांचा सन्मान करते. आर्थिक मदतीमुळे कुटुंबाचं नुकसान भरून निघणार नाही. परंतु, त्यांना सन्मानाने जगण्यास मदत होईल, असं त्या पुढे म्हणाल्या.

कोविड काळात संजय मनचंदा हे रुग्णांच्या देखभाल सुविधेत फार्मासिस्ट म्हणून तैनात होते. त्यांनी आशा कार्यकर्त्यांसह कंटेन्मेंट झोनलाही भेट दिली होती. तर रवी कुमार सिंग हे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून तैनात होते. वीरेंद्र कुमार हे साथीच्या आजारात भूक निवारण केंद्रात स्वच्छतेची जबाबदारी सांभाळत होते. भवानी चंद्रा या साथीच्या काळात लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात कर्तव्यावर तैनात होत्या. मोहम्मद यासीन हे साथीच्या आझारात रेशन वितरणासाठी ड्युटीवर तैनात होते.

मुख्यमंत्री काय म्हणाल्या?

“मृतांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याला दुजोरा देताना आतिशी म्ङणाल्या, सरकार या करोना योद्धांच्या कुटुंबीयांना सदैव पाठिंबा देत राहील. या योजनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना सरकार आणि समाज त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा विश्वास देते. कोविड १९ साथीचे रोग सर्वांसाठी एक गंभीर संकट होते. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. परंतु, आमच्या करोना योद्धांनी दिल्ली वाचवण्यासाठी जोखीम पत्करली. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांसारख्या हजारो करोना योद्धांनी दिवसभर काम केले. साथीच्या रोगाशी लढण्यााठी रात्री त्यांच्यापैकी अनेकांनी सेवेत आपला जीव गमावला आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm announces 1 crores ex gratia to families of covid warriors who died during pandamic sgk