दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. देशातील भाजपा सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वारंवार करण्यात येतो. पंतप्रधानांचा हा दावा खोडून काढत केजरीवाल यांनी टीकास्र सोडलं आहे. “मला सीबीआय, ईडीवर एक दिवसासाठी नियंत्रण दिल्यास भाजपाचे अर्धे नेते तुरुंगात जातील”, असे विधान केजरीवाल यांनी केले आहे. ‘एनडीटीव्ही’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आप नेत्यांवर दाखल खटल्यांवरुनही केजरीवाल यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Gujarat Election 2022 : ‘आप’ने मुख्यमंत्र्यांना डिवचलं, भूपेंद्र पटेलांना ‘कटपुतली’ म्हणत केजरीवालांचा हल्लाबोल

“गेल्या सात वर्षांमध्ये त्यांनी (भाजपा) आप नेत्यांवर १६७ खटले दाखल केले आहेत. मात्र, एकाही खटल्यातील आरोप ते न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. १५० हून अधिक खटल्यांमधून आप नेते दोषमुक्त झाले आहेत. तर उर्वरित खटले प्रलंबित आहेत. तपास यंत्रणेच्या ८०० अधिकाऱ्यांकडून आप नेत्यांवर दाखल खटल्यांबाबत तपास करण्यात आला. मात्र, त्यांना काहीही सापडले नाही. या यंत्रणांनी आपविरोधात खोटे खटले दाखल केल्यामुळे त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

कॉनमॅन सुकेशचा मुख्यमंत्री केजरीवालांवर लेटर बॉम्ब, पॉलीग्राफ चाचणीचं आव्हान देत म्हणाला, “पैसे देऊन…”

ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या कथित प्रकरणात दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. उत्पादन शुल्क धोरण अंमलबजावणीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयच्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच प्रकरणात आपचे संपर्क प्रभारी ईडीच्या ताब्यात आहेत. हे सर्व खटले राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे.

जगभरातील मोठय़ा ‘आयपीओं’मध्ये ‘पेटीएम’ची सर्वात सुमार कामगिरी

दिल्ली महापालिकेची निवडणूक आप जिंकेल, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. एकूण २५० जागांपैकी ‘आप’ला २३० हून अधिक जागा मिळतील, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत भाजपाला केवळ २० जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm arvind kejriwal criticized bjp said give me control of cbi ed for one day half of bjp will be in jail rvs