दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांना सोमवारी (३० जानेवारी) रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोन कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली. धमकीच्या या कॉलनंतर दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. तपास केल्यानंतर धमकी देणारा आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>> “एकेकाळी इतर देशांवर अवलंबून असलेला आपला भारत देश आज…” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कौतुक

अरविंद केजरीवाल यांना धमकी देणारा आरोपी ३८ वर्षीय असून तो मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर दिल्लीमधील गुलाबी बाग येथे उपचार सुरू आहेत.