आगामी काळात भाजपाविरोधी आघाडीमध्ये सामील होण्याबाबत आम आदमी पक्षाची कुठलीही योजना नाही, असे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. आम आदमी पक्षाच्या विजयी उमेदवारांचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केजरीवाल यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. भारताच्या १३० कोटी जनतेची युती निर्माण करा, असे आवाहन या अधिवेशनात केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने ‘आप’विरोधात भाजपची दडपशाही;माध्यमांच्या मालकांना धमकावण्यात आल्याचा केजरीवाल यांचा आरोप

गुजरातमध्ये ‘आप’च्या वाढलेल्या लोकप्रियतेने भाजपाला धडकी भरली आहे. आपला संपवण्यासाठी भाजपा पक्षाच्या आमदारांना भ्रष्टाचाराच्या खोट्या प्रकरणांमध्ये अडकवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ‘ऑपरेशन लोटस’ अंतर्गत दिल्ली आणि पंजाबमधील आपच्या आमदारांना फोडण्याचा भाजपाने प्रयत्न केला. हा प्रयत्न अपयशी ठरल्याचे केजरीवाल या अधिवेशनात म्हणाले. ‘ऑपरेशन लोटस’साठी जबाबदार लोक गद्दार आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, असेही केजरीवाल या अधिवेशनात म्हणाले आहेत. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह गुजरात पिंजून काढला आहे.

आम आदमी पार्टी छोट्या ‘कान्हा’ सारखी आहे, दहा वर्षांपासून राक्षसांना मारत आहे – अरविंद केजरीवाल

भारताला जगात क्रमांक एकचा देश बनवण्यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. “हे केवळ एकाच पक्षाचे अभियान नाही. भाजपा आणि काँग्रेससह देशातील सर्व पक्षांनी यासाठी एकत्र आले पाहिजे. भारत जगाचे नेतृत्व करू शकतो. देशातील १३० कोटी जनतेने यासाठी एकत्र आले पाहिजे”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm arvind kejriwal said no plans to join anti bjp alliance rvs