सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केलेले सत्येंद्र जैन हे देशभक्त असल्याचे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. तसेच मोहल्ला क्लिनिक मॉडेलचे शिल्पकार म्हणून सत्येंद्र जैन यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले जावे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशाला सत्येंद्र जैन यांचा अभिमान

केजरीवाल म्हणाले की, सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. ईडीच्या तपासात सत्येंद्र जैन स्वच्छ बाहेर येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सत्येंद्र जैन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या माजी महासचिवांसह जगभरातील लोक भेट देणार्‍या मोहल्ला क्लिनिकची संकल्पना मांडल्याने देशाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जैन यांना क्लीन चिट दिली असून आता ईडीने तपास सुरू केला आहे. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये सत्येंद्र जैन आरोग्य, ऊर्जा आणि गृह यासह विविध मंत्रालये सांभाळत आहेत. ईडीने सोमवारी आम आदमी पक्षाचे (आप) नेते सत्येंद्र जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत अटक केली होती.