दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्यधोरण घोटाळ्यात त्यांना केलेल्या अटकेचा निषेध नोंदवत जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे. आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत सीबीआयवर गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल हे सध्या मद्य घोटाळा प्रकरणात आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने कारवाई केली आहे. मात्र आपल्या अटकेच्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी याचिकेत काय म्हटलंय?

अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी याचिकेत म्हटलं आहे की एप्रिल २०२३ मध्ये जेव्हा मला चौकशीसाठी बोलवण्यात आलं तेव्हा मी त्यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र मला वारंवार त्रास देण्यात आला. सीबीआय चौकशीच्या नावाखाली मला किती मानसिक त्रास देता येईल हेच सीबीआयने पाहिलं. सीबीआयची वागणूक हा माझा मानसिक छळ आहे याला दुसरं काहीही म्हणता येणार नाही. तसंच माझी चौकशी पूर्ण झाली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Narendra Mehta, Geeta Jain, Geeta Jain agitation,
भाईंदर : नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर, कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याने जैन यांचे ठिय्या आंदोलन
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

सीबीआयसारखी संस्था कायदेशीर प्रक्रियेशी खेळ करते आहे

सीबीआयच्या विरोधात केलेल्या या याचिकेत केजरीवाल म्हणतात, मला अटक करण्यासंबंधीचे पुरावे आधीच रेकॉर्डवर आहेत. सीबीआयसारखी संस्था कायदेशीर प्रकियेशी खेळ करते आहे. सीबीआयचा दृष्टीकोन पक्षपाती आणि एकतर्फी आहे. त्यांनी नि:पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे. मात्र ते तसं वागताना दिसत नाहीत उलट ते माझा छळ करत आहेत. सीबीआयचे अधिकारी देत असलेली वागणूक ही निष्काळजीपणाची आहे तसंच अधिकाराचं हनन करणारी आहे. माझ्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम सीबीआयने केलं आहे. तसंच मला जामीन मिळू नयेत यासाठीही सोयीस्कर प्रयत्न करण्यात आले असाही आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- यूपीएससी सूत्र : लोकसभेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष पद अन् अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केलेली अटक, वाचा सविस्तर…

सीबीआयकडून माझा छळ केला जातो आहे

अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे की माझा छळ केला जातो आहे. ज्या पुराव्यांच्या आधारे मला अटक करण्यात आली ते पुरावे आधीच रेकॉर्डवर आहेत. १ वर्षे १० महिन्यांनी मला अटक केली गेली याबाबतही प्रश्न उपस्थित होतो. कारण जर पुरावे होते तर इतके महिने मला अटक करण्यासाठी वाट का पाहिली गेली? माझी सुटका व्हावी, जामीन मिळावा यासाठी मी जे प्रयत्न करत होतो त्यापासूनही मला रोखण्यात आलं असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. कलम ४१ (१) (ब) चं उल्लंघन करण्यात आलं. मला कैद करतानाही मनमानी पद्धतीने नियम धाब्यावर बसवण्यात आले. सीबीआयने दिलेले जे पुरावे आहेत ते पुरावे एकदा न्यायालयाने पाहिले पाहिजेत, ते आधीपासून रेकॉर्डवर आहेत. त्यात काही आरोपींची नावंही आहेत असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.