Delhi CM Swearing-in Ceremony 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली. त्यामुळे दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांची नावेही चर्चेत होती. मात्र, अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमताने निवड केली. या निवडीनंतर अरविंद केजरीवाल यांनी (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. आता आज शनिवार (२१ सप्टेंबर) आतिशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरिष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. सध्याच्या आम आदमी पार्टीतील बहुसंख्य नेते हे त्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचदरम्यान, आतिशी या केजरीवाल व इतर नेत्यांच्या संपर्कात आल्या. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या दिल्लीतल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
Delhi CM Atishi Oath Live Updates | आतिशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, आज दिल्लीत शपथविधी सोहळा
#WATCH | AAP leader Atishi takes oath as Chief Minister of Delhi pic.twitter.com/R1iomGAaS9
— ANI (@ANI) September 21, 2024
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी नुकतीच शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा उपराज्यपालांच्या निवासस्थानी पार पडला. आतिशी या आपच्या आमदार आहेत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी थोड्याच वेळात शपथ घेतील. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्यासह त्या उपराज्यपालांच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत.
#WATCH | Delhi Chief Secretary Dharmendra greets AAP National Convenor & Former CM Arvind Kejriwal at Raj Niwas pic.twitter.com/KJ6lvTWvCC
— ANI (@ANI) September 21, 2024
आतिशी यांच्यासह सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, गोपाल राय, इमरान हुसैन, मुकेश अहलावत हे पाच आमदारही शपथ घेणार आहेत. त्यांना कुठली खाती मिळणार हे नंतर स्पष्ट होणार आहे.
आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरच्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. तसेच त्या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. माजी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल यांनी शिक्षण मंत्रालयासह सिसोदिया यांच्याकडील खाती व इतर महत्त्वाची खाती आतिशी यांच्याकडे सोपवली होती. आतिशी या कालकाजी विधानसभा मतदार संघाच्या आमदार आहेत.
आतिशी मार्लेना या दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून आमदार आहेत.
अरविंद केजरीवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आहे.
माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
आतिशी दिल्ली सरकारमधील उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी एक आहेत.
आतिशी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासाची मास्टर्स पदवी घेतली आहे
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आतिशी ( Atishi ) यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या विश्वासू नेत्या अशी आतिशी मार्लेना यांची ओळख आहे. महिला असणं आणि मंत्री असणं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ज्या महिला मंत्र्यांकडे सर्वाधिक खाती आहेत त्यापैकी आतिशी या एक आहेत. आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा आपचा जाहीरनामा आतिशी यांनी तयार केला होता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली. त्यामुळे दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांची नावेही चर्चेत होती. मात्र, अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमताने निवड केली.