अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भेटण्याच्या त्याच्या बहिणींच्या अर्जाबाबत विचार करावा, असे निर्देश दिल्लीतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिले. गेल्या २७ वर्षांपासून राजनला भेटलेली नसल्याचे राजनच्या बहिणींनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
सुनीता सखाराम चव्हाण आणि मालिनी सकपाळ या राजनच्या बहिणींच्या अर्जावर विशेष सीबीआय न्यायाधीश विनोद कुमार यांच्यापुढे सुनावणी झाली. राजनला भेटण्याच्या परवानगीबाबतचा अर्ज घेऊन सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला न्यायालयाने सुनीता आणि मालिनी यांना दिला. आम्ही राजनला भेटल्यास त्याचा तपासात अडथळा येणार नाही आणि न्यायालयाच्या अटींचे पालन करू, असे त्यांनी या अर्जात म्हटले आहे.
छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली आहे. मुंबई आणि दिल्लीत त्याच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्हयांचा तपास सीबीआय करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा