इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांच्या पोलिस (एनआयए) कोठडीत मंगळवारी सात दिवसांनी वाढ करण्यात आली. दोघांच्या डीएनएचे नमुने घेण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. ती देखील मान्य करण्यात आली.
‘त्या’ स्फोटाचा बदला घेण्यासाठीच भटकळने केले हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट

भटकळ आणि अख्तर या दोघांना २८ ऑगस्टला रात्री बिहारमधील नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली. देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी वेगवेगळ्या राज्यातील पोलिस आणि एनआयए गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शोधात होती. यासिन भटकळ ४० दहशतवादी कृत्यांप्रकरणी हवा आहे. त्याच्या शोधासाठी ३५ लाखांचे इनाम होते. चौकशीत भटकळने पुणे, वाराणसी आणि हैदराबाद स्फोटांमध्ये सहभाग असल्याचे मान्य केले आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या वेळी यासिनसोबत कोण होते?
 

Story img Loader