आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल १८ महिन्यानंतर ते आता तुरुंगांतून बाहेर येणार आहेत. दिल्ली न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांचा जातमुचलक जामीन दिला असून यादरम्यान देश सोडून जाऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सत्येंद्र जैन यांना २०२२ मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महत्त्वाचे म्हणजे सत्येंद्र जैन यांना गेल्या वर्षी मे महिन्यात प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना पुन्हा आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची सुनावणी संपायला अजून बराच कालावधी लागेल. तोपर्यंत सत्येंद्र जैन यांना तुरुंगात ठेवता येणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना जामीन मंजूर करतो आहे, असं यावेळी न्यायालयाने सांगितलं.

हेही वाचा – Haryana Election Result : हरियाणात ‘आप’च्या ८८ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त; दिल्लीच्या निवडणुकीत काय होणार? केजरीवालांची धडधड वाढली

सत्येंद्र जैन यांच्यावर काय आरोप आहेत?

सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदावर असताना काही कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामध्ये ४ कोटी ८१ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. या प्रकरणात सत्येंद्र जैन यांची अनेकदा चौकशीदेखील करण्यात आली होती. मात्र, सत्येंद्र जैन हे योग्य माहिती देत नसल्याने ३० मे २०२२ रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.

हेही वाचा – Delhi CM Atishi : दिल्लीत राजकारण तापलं, सोनम वांगचुक यांना भेटू न दिल्याने मुख्यमंत्री आतिशींचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाल्या…

४.८१ कोटींची संपत्ती जप्त

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबाशी संबंधित तब्बल ४.८१ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली संपत्ती बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. तर सत्येंद्र जैन यांच्यावर झालेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आम आदमी पक्षाकडून फेटाळण्यात आले होते.