‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. ट्वीटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आले होते. एका ट्वीटर युजरने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५००० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, असेही कोर्टाने झुबेर यांना सांगितले आहे.
हेही वाचा >>> …म्हणून एलॉन मस्क स्वत:च्या वडिलांशी बोलत नाही; एरोल मस्क यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड
चार वर्षांपूर्वी ट्वीटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे तसेच द्वेषाला उत्तेजन या आरोपांखाली झुबेर यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आले होते. त्यानंतर ११ जुलै रोजी त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्याआधीच झुबेर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. फिर्यादी पक्षाने झुबेर यांनी लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे तसेच लोकांना भडकावणारे ट्वीट केल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करु नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. यावेळी पोलिसांनी झुबेर यांना विदेशातून निधी मिळाल्याचाही उल्लेख केला. “झुबेर यांनी विदेशातून काही रक्कम स्वीकारलेली असून, अजूनही त्यांनी पैसे देणाऱ्यांची माहिती दिलेली नाही,” असे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले.
हेही वाचा >>> दिल्लीत धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींकडून घटनेचे चित्रीकरण
तर झुबेर यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. झुबेर यांचे जुने ट्वीट एका निनावी ट्विटर अकाऊंटने शोधलेले आहे. मात्र हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या ट्विटर अकाऊंटच्या मागे नेमकं कोण आहे? हे समोर आलेले नाही. झुबेर यांनी कोणतीही परदेशातून देणगी स्वीकारलेली नाही, असा दावा झुबेर यांच्या वकिलांनी केला.
हेही वाचा >>> रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या; एअर इंडिया बॉम्बस्फोट प्रकरणात झाली होती निर्दोष मुक्तता
नोहेंबरमध्ये एफआयआर दाखल
दरम्यान, २५ नोहेंबर २०२१ रोजी एका खाजगी वृत्तवाहिनीचे पत्रकार आशिष कटियार यांनी झुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. कटियार यांनी आपल्या तक्रारीत झुबेर यांनी चॅनलबद्दल ट्वीट करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने कटियार यांनी लखीमपूर खेरी येथील स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर, झुबेर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम १५३ ए (दोन गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता.