राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत घेतल्याच्या आरोपाखाली ४ जणांना अटक केली. तसेच “तूप तयार आहे…” अशा आशयाच्या चर्चेचा आधार घेत हे वाक्य म्हणजे दहशतवाद्यांमधील कोडवर्ड असल्याचा दावा केला. तूप म्हणजे स्फोटकं आणि खिदमतचा अर्थ दहशतवाद्यांची मदत असल्याचं एनआयएचं म्हणणं होतं. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने एनआयएने दावा करताना याबाबत कोणताही पुरावा सादर केला नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ४ जणांची निर्दोष सुटका केलीय.

नेमकं प्रकरण काय?

एनआयएने मोहम्मद सलमान, मोहम्मद सलीम, आरिफ गुलाम बशीर धर्मपुरिया आणि मोहम्मद हुसेन मोलानी यांच्यावर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून आर्थिक मदत घेतल्याचा आरोप ठेवला. त्यांनी फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशनकडून (FIF) आर्थिक मदत घेऊन आरोपींनी भारतात स्लीपर सेल तयार केली. त्याचा वापर करून भारतात दहशतवाद पसरवला जातोय, असा आरोप केला.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
gang vandalised 13 vehicle in aundh
ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
Allegations against Amit Shah baseless The Ministry of Foreign Affairs informed the High Commission of Canada
‘अमित शहांवरील आरोप निराधार’; परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तालयाला सुनावले
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
navra maza navsacha 2
Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

एनआयएने म्हटलं, “आरोपींनी एक मशिद बनवण्यासाठी दहशतवाद्यांकडून पैसे घेतले. मोहम्मद सलमानच्या फोनमध्ये दोन मेसेज मिळाले. यातील एका मेसेजमध्ये ‘तूपाची व्यवस्था झालीय, मुंबईतली पार्टी देखील आलीय…त्यांच्या हस्ते पाठवून देऊ’ असा आशय होता.”

‘तूप’ आणि ‘सेवा’ या शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात : न्यायालय

दुसऱ्या मेसेजमध्ये, ‘आम्ही तुमच्या सेवेत होतो त्यामुळे तुम्हाला याची माहिती नाही’ असा आशय होता. एनआयएने या शब्दांचा अर्थ दहशतवाद्यांना मदत केल्याचा काढून आरोपपत्रात या दोन्ही मेसेजचा समावेश केला होता. आरोपी या मेसेजमध्ये दहशतवाद्यांना मदत करण्याबाबत बोलत असल्याचा आरोप एनआयने केला होता.

हेही वाचा : जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी एनआयएला आपल्या आरोपांबाबत पुरावे सादर करता आले नसल्याचा नमूद केलं. तसेच शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात. त्यामुळे एनआयएचे आरोप विनापुरावे स्वीकारता येणार नाही, असंही सांगितलं.