आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबरला दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं ( ईडी ) अटक केली आहे. शुक्रवारी ( १३ ऑक्टोबर ) संजय सिंह यांना दिल्लीमधील राउज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी संजय सिंह यांच्या एका कृतीवरून न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय सिंह यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील सुनावणी २७ ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी न्यायालयानं संजय सिंह यांना आपलं मत मांडण्याची संधी दिली. तेव्हा संजय सिंह यांनी ईडीला लक्ष्य करत उद्योगपती गौतम अदाणी यांचा उल्लेख केला.

संजय सिंह म्हणाले, “आठ दिवसांपासून ईडीच्या कोठडीत आहे. पण, एकाच व्यक्तीनं २-३ तासच चौकशी केली. तुमच्या आईस पैसे का दिले? कुणाला पैशांची मदत केली का? असे सवाल ते विचारत आहेत. त्यांनी गांभीर्यानं तपास करायला हवा होता. पण, ईडी हा एक मनोरंजनाचा भाग झाला आहे.”

हेही वाचा : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण काय आहे? ‘आप’ नेत्यांवर ईडीने कोणते आरोप केले आहेत?

यानंतर संजय सिंह यांनी अदाणी यांचं नाव घेतलं. “अदाणी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. पण, त्याचा तपास झाला नाही,” असा सवाल संजय सिंह यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : विश्लेषण : दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण घोटाळा नेमका काय आहे? मनीष सिसोदिया यांचा या घोटळ्याशी काय संबंध, घ्या जाणून

यावर न्यायाधीश एम.के. नागपाल चांगलेच संतापले. “याप्रकरणाचा येथे काहीही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदाणींबद्दल येथे बोलू दिले जाणार नाही. तुमच्या प्रकरणाशी संबंधित बोलायचे असेल, तर बोलू शकता. पण, राजकीय भाष्य करता येणार नाही. तुम्हाला हेच करायचे असेल, तर इथे येण्याची गरज नाही. दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला हजर केले जाईल,” असं एम.के. नागपाल यांनी म्हटलं. ‘एनडीटीव्ही’नं हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi court reprimand aap mp sanjay singh for taking modi and adani name ssa