हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गाजलेल्या रोहिणी न्यायालय गोळीबार प्रकरणातील आरोपी टिल्लू ताजपुरियाचा मंगळवारी खून झाला. तो शिक्षा भोगत असलेल्या तिहार तुरुंगात गोगी टोळीच्या सदस्यांनी त्याचा खून केल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. टिल्लू ताजपुरियाला ठेवलेल्या कोठडीचे गज कापून त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्याची कोठडी सुरक्षेच्या दृष्टीने उच्च जोखमीच्या भागात असतानाही त्याच्यावर हल्ला करण्यात मारेकऱ्यांना यश आले.
सुनील ऊर्फ टिल्लू ताजपुरियावर (३३ वर्षे) २०२१ साली दिल्लीतील रोहिणी न्यायालयात गोळीबार करून जितेंदर गोगीचा खून केल्याचा आरोप होता. याच गोगी टोळीच्या दीपक ऊर्फ तितर, योगेश ऊर्फ टुंडा, राजेश आणि रियाझ खान या चार सदस्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असे तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. टिल्लू ताजपुरियाची कोठडी तळमजल्यावर होती आणि चौघा मारेकऱ्यांची कोठडी पहिल्या मजल्यावर होती. त्यांनी सकाळी सव्वासहा वाजता चादरीचा वापर करून तळमजल्यावर उडय़ा मारल्या आणि ताजपुरियाच्या कोठडीचे गज कापले. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आधी तुरुंगातच उपचार करण्यात आले. त्यानंतर पावणेसात वाजता त्याला रुग्णालयात नेण्यात आले.