केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना दिल्लीतील न्यायालयाने संजय निरुपम यांच्या बदनामी खटल्यासंबंधी समन्स धाडले आहेत.
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी स्मृती इराणींविरोधात डिसेंबर २०१२ साली अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणासंबंधी महानगर दंडाधिकारी धीरज मित्तल यांनी येत्या २७ सप्टेंबर पूर्वी  स्मृती इराणी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
२०१२ सालच्या गुजरात विधानसभांच्या निकालावेळी स्मृती इराणी यांनी टेलिव्हिजनवरील एका वादविवाद कार्यक्रमात बदनामीकारक आणि अश्लाघ्य टिप्पण्या केल्याचे म्हणत संजय निरुपम यांनी इराणी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
स्मृती इराणी यांनी कार्यक्रमादरम्यान निरुपम यांच्या चारित्र्यावर टीका करून वैयक्तीक बदनामी केली आणि इराणी यांच्या वक्तव्यामुळे निरुपम यांच्या समाजप्रतिमेला धक्का पोहोचला असल्याचा आरोप निरुपम यांच्या वकिलांनी केला आहे.
दुसऱया बाजूला स्मृती इरणी यांनीही निरुपम यांच्यावर त्याच कार्यक्रमात वैयक्तीक बदनामी झाल्याचे म्हणत अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता त्यामध्ये निरुपम यांना इराणी यांच्याशी असभ्य भाषेत वादकेल्याबद्दल न्यायालयाने फटकारले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा