Delhi Crime : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात अनेक ठिकाणी खूनाच्या आणि हाणामारीच्या घटना घडत असल्याचं सातत्याने समोर येत आहे. आता दिल्लीतही एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. दिल्लीमधील ग्रेटर कैलास येथील एका जिमबाहेर एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीत एका जिमबाहेर एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमागे टोळी युद्धाचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. या गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नादिर शाह असं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीला तब्बल चार ते पाच गोळ्या लागण्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : Rape Attempt on Nurse: बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने वार; नर्सच्या धाडसामुळं अनर्थ टळला, आरोपींना अटक

नेमकी घटना काय घडली?

दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलास या परिसरात एका जिमबाहेर दोन व्यक्ती उभ्या असलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचवेळी अचानक एक व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीवर गोळीबार करते. या गोळीबारात उभा असलेल्या दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीला तब्बल चार ते पाच गोळ्या लागतात. यावेळी हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. तर गोळीबार सुरु असतानाच दुसरी व्यक्ती पळून जाताना दिसत आहे. तर गोळी लागलेला व्यक्ती गंभीर जखमी होतो. त्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला.

या घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, जिमजवळ तब्बल १० राऊंड गोळी झाडल्याचा आवाज झाला होता. दरम्यान, नादिर शाहचा गुन्हेगारी इतिहास असून या हल्ल्याचा परिसरात सुरू असलेल्या टोळीयुद्धाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गोल्डी ब्रारचा जवळचा गँगस्टर रोहित गोदाराच्या नावाने सोशल मीडियावर दावा करण्यात आल्याचं इंडिया टुडेनी वृत्तात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi crime news a person was shot dead in delhi the incident was caught on cctv gkt