Delhi Crime : देशभरात गुन्हेगारीच्या घटना साततत्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. आता दिल्लीत एक धक्कादायक घडना घडली आहे. दिल्लीच्या बवानामधील लोह रोड परिसरातील एका इमारतीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाची हत्या करताना त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घालून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोज नोई बाबू असं मृत व्यक्तीच नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, बसच्या सीटवर बेसनाची भाजी सांडली होती. त्यामुळे ड्रायव्हरने त्या व्यक्तीला ते साफ करण्यास सांगितलं. मात्र, ते साफ करण्यास तरुणाने नकार दिला. त्यानंतर ड्रायव्हरने त्या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच त्यानंतर त्या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आल्याने तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर तरुणाचा मृतदेह बवाना बस डेपोजवळील तलावाजवळ फेकून देत आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून शनिवारी रात्री उशिरा सुशांत शर्मा (वय २४) व्यक्तीला अटक केलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी बस चालक आशिष आणि त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बस ताब्यात घेत आरोपींचा तपास सुरु केला.

पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मृत मनोज हा मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. तो दिल्लीत भावासोबत राहत होता. १ फेब्रुवारीच्या रात्री सुलतानपूर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीत जेवण बनवून ते परतत होते. त्यावेळी मनोजचा मित्र दिनेशही तिथे होता. मनोजने कार्यक्रमानंतर उरलेले अन्न घरच्यांसाठी चालवले होते. तेव्हा घरच्यासाठी चालवलेले अन्न बसच्या सीटवर पडले. त्यावरून बस चालकाने शिवीगाळ केली. तसेच बस बवाना चौकात थांबली असता बस चालकाने ते सीट स्वच्छ करण्यास सांगितलं. मात्र, त्याने ते सीट स्वच्छ करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.

या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. तेव्हा आरोपींनी बसमध्ये असलेला लोखंडी रॉड मनोजच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह बवना उड्डाणपुलाजवळ तलावाच्या काठावर फेकून दिला आणि पळ काढला. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्यांनी मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आणि बसचा शोध घेतला व एकाला अटक केली. तसेच अजून पुढील तपास पोलीस करत आहेत.