Spy Cam in Delhi Rented House: दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या बेडरूम व बाथरूमच्या बल्बमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याचं आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. ही तरुणी दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करते. घरमालकाच्या ३० वर्षीय मुलानंच हा सगळा प्रकार केला असून त्याच्याविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आणखी एक कॅमेराही ताब्यात घेतला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

हा सगळा प्रकार दिल्लीच्या शकरपूर भागातला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी ही तरुणी या भागात एका भाड्याच्या घरात राहत होती. दिल्लीतून बाहेर जाण्याच्या वेळी सदर तरुणी घराची चावी घरमालकाचा मुलगा करन याच्याकडे सोपवून जात होती. घरातील डागडुजी आणि दुरुस्ती कामाचं निमित्त सांगून करन तिच्याकडून चावी घेत असे. तरुणी घरी नसताना करननं घरात जाऊन दोन स्पाय कॅमेरे बसवले होते.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
Sarpanch husband caught cheating on his wife with girlfriend wife beats girlfriend video viral mp
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आधी तरुणीला तिच्या बाथरूमच्या बल्बमध्ये कॅमेरा बसवल्याचं आढळून आलं. बल्बच्या होल्डरमध्ये हा कॅमेरा बसवण्याल आला होता. त्यानंतर तरुणीनं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतल्यानंतर तिच्या बेडरूममधील बल्ब-होल्डरमध्येही कॅमेरा बसवल्याचं पोलिसांना आढळून आलं.

करननं दिली कबुली

दरम्यान, आपल्या अनुपस्थितीत चावी करनला देत असल्याचं तरुणीनं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तेव्हा करननं सगळा प्रकार कबूल केला. करन त्याच इमारतीत वास्तव्यास आहे. तीन महिन्यांपूर्वी सदर तरुणी गावी गेली असता तिच्या अनुपस्थितीत त्यानं घरात दोन स्पाय कॅमेरे बसवले. त्यानं बाजारात सहज मिळणारे स्पाय कॅमेरे यासाठी विकत आणले होते. त्यातला एक तिच्या बाथरूममध्ये तर दुसरा बेडरूममध्ये बसवला होता.

‘नवऱ्याचं दुसरं लग्न होईल, मुलानं मात्र आई गमावली’, यकृत दान केल्यानंतर ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू; सोशल मीडियावर लोकांचा संताप

दोन लॅपटॉपमध्ये सापडले कॉपी केलेले व्हिडीओ!

हे कॅमेरे ऑनलाईन पद्धतीने ऑपरेट करता येत नव्हते. त्यामुळे करन काही ना काही कारण सांगून तरुणीकडून घराची चावी ठेवून घ्यायचा. यावेळी तो कॅमेऱ्यांच्या मेमरी कार्डमधील रेकॉर्डेड व्हिडीओ त्याच्या लॅपटॉपवर ट्रान्सफर करून घ्यायचा. करननं या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेले सर्व व्हिडीओ दोन वेगवेगळ्या लॅपटॉपवर पोलिसांना आढळून आले.