Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष पुन्हा सत्ता राखणार की भाजपा किंवा काँग्रेस विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात महिलांसाठी सर्वच पक्षांनी मोठी आश्वासने दिली आहेत. यादरम्यान यंदा दिल्लीत विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि निकाल आज (८ फेब्रुवारी रोजी) जाहीर होणार आहेत. दरम्यान दिल्लीत महिला मतदारांचा टक्का वाढल्याने ‘लाडक्या बहि‍णीं’चा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

शहरातील एकूण नोंदणी केलेल्या महिला मतदारांपैकी (७२.३७ लाख) ६०.९२ टक्के महिलांनी मतदान केले आहे तर पुरुषांची संख्या ६०.२१ टक्के इतकी आहे.

Delhi Assembly Election 2025 Live Results- Party-wise Seat Count & Winners in Marathi
Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates: दिल्लीत धक्कादायक निकाल लागणार? पहिल्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल पिछाडीवर!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 LIVE : प्राथमिक फेरीत आपचे आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर; अरविंद केजरीवालांचं भवितव्य धोक्यात?
BJP Delhi Assembly Election Results 2025 Live Updates
BJP Delhi Election Results 2025 Live: मतमोजणीदरम्यान भाजपाची २६ जागांवर, तर आप २२ जागी आघाडीवर
Narela Assembly Election Result 2025
Private: Narela Vidhan Sabha Election Result 2025 Live: नरेला विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Delhi Vidhan Sabha Poll 2025
Delhi Exit Poll Results 2025 : दिल्लीत सत्तांतर? दहापैकी आठ मतदानोत्तर चाचण्यांचा भाजपला कौल
Delhi Assembly Election Exit Poll Results 2025
Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Delhi Assembly Elections 2025 Live Updates in Marathi
Delhi Exit Poll Results 2025 : “दिल्लीत आम्हीच सत्ता स्थापन करू”, Exit Poll नंतर आम आदमी पक्षाचा दावा

दिल्लीत ४६ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार या महिला

निवडणुकीत मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत आहे आणि २०२०च्या निवडणुकीत ते जवळजवळ पुरुषांच्या टक्केवारी इतकेच होते. दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले आहे. ज्यामध्ये आप, भाजप आणि काँग्रेसने उभे केलेल्या २१० उमेदवारांमध्ये फक्त २५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीतील ४६ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार या महिला आहेत.

शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ४० मतदारसंघांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे मतदानाचे प्रमाण जास्त होते. यामध्ये दक्षिण, आग्नेय, मध्य, वायव्य आणि नैऋत्य दिल्लीतील अनेक मतदारसंघांचा समावेश आहे.

ओखला येथे ५ टक्क्यांचा सर्वाधिक फरक दिसून आला, येथे ५८.२ टक्के नोंदणी केलेल्या महिला मतदारांनी मतदान केले, पुरूष मतदारांची संख्या ५२.५ टक्के राहिले.

बदरपूर, तुघलकाबाद, कालकाजी आणि संगम विहार मतदारसंघ जेथे सध्या आम आदमी पक्षाचे (आप) आमदार आहेत येथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा कमीत कमी तीन टक्के जास्त होती. तर ग्रेटर कैलाश आणि विश्वास नगर या दोन मतदारसंघांमध्ये पुरुष आणि महिलांचे मतदान सारखेच होते.

आजवर तीन महिला मुख्यमंत्री

१९९३ मध्ये विधानसभा स्थापन झाल्यापासून दिल्लीत तीन महिला मुख्यमंत्री मिळाले आहेत – भाजपाच्या सुषमा स्वराज (१९९८), काँग्रेसच्या शीला दीक्षित (१९९८-२०१३) आणि आपच्या आतिशी (सप्टेंबर २०२४- आतापर्यंत).

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप, भाजपा आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचारात महाराष्ट्र, झारखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांप्रमाणेच, जर ‘आप’ पुन्हा सत्तेत आले तर कर न भरणाऱ्या महिलांना दरमहा २,१०० रुपये दिले जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. तसेच महिलांसाठी मोफत बस प्रवास देण्याच्या योजनेचा देखील या निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग होता. भाजपा आणि आपने देखील याप्रमाणेच महिलांना २५०० रुपये दरमहिना देण्याचे आश्वासन प्रचारात दिले होते.

Story img Loader