लष्करे तैय्यबाचा म्होरक्या हाफीज सईदने दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंवर हल्ला करण्याची धमकी दिलीये. सईदच्या धमकीमुळे दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागाने दिल्ली पोलिसांना हल्ल्याच्या शक्यतेबद्दल माहिती दिल्यावर राजधानीतील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आणि ऐतिहासिक वास्तूंभोवतीच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली. ईदनिमित्त हाफिज सईदने शुक्रवारी लाहोरमधील गद्दाफी मैदानावर सभेमध्ये भाषण केले. हाफिजच्या सभेबद्दल लाहोरमध्ये मोठा प्रचार करण्यात आला होता. वेगवेगळ्या ठिकाणी हाफिजच्या सभेचे पोस्टर लावण्यात आले होते.
गेल्या सोमवारीच पूंछमधील सरला छावणीवर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.

Story img Loader