दिल्लीतल्या मुखर्जी नगरमधील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरच्या इमारतीत अडकलेले विद्यार्थी दोरीच्या सहाय्याने खाली उतरताना दिसले. तर काहींनी खिडकीतून उड्या मारल्या. सुदैवाने या आगीमुळे कोणत्याही विद्यार्थाला दुखापत झाली नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु इमारतीच्या खिडकीतून उडी मारल्यामुळे चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही आग लागली तेव्हा कोचिंग सेंटरमध्ये वर्ग सुरू होते. तेव्हा इमारतीत ४०० हून अधिक विद्यार्थी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दिल्लीच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग म्हणाले आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२.२७ वाजता ही आग लागली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती.

काही विद्यार्थी दोरीच्या सहाय्याने इमारतीतून खाली उतरताना दिसले. तर काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून उडी मारली. यात चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. दिल्लीतलं मुखर्जी नगर म्हणजे कोचिंग सेंटर हब आहे. येथे सिव्हिल सर्व्हिसेस, स्पर्धा परिक्षांपासून ते इतर कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणात आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येथे खासगी कोचिंगसाठी येतात.

हे ही वाचा >> हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेचा दावा करणाऱ्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या आगीमुळे कोचिंग सेंटरच्या इमारतीत सर्वत्र धूर झाला होता. यामुळे अनेक विद्यार्थी दोरीच्या सहाय्याने खिडकीतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. काही विद्यार्थी दोरीच्या सहाय्याने खाली उतरताना पडून जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.