गेल्या महिन्यात दिल्लीत नराधमांच्या वासनेला बळी पडलेली तरुणी अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती़  शेवटच्या परीक्षेत तिला ७३ टक्के गुण मिळाल्याने ती भौतिकोपचार शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या संस्थेने जाहीर केले आह़े  वर्गमित्रांपेक्षा तिची टक्केवारी अधिक असल्याचे संस्थेने नमूद केले आह़े
२३ वर्षीय पीडित तरुणीने २००८ साली साई शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला होता़  चार वर्षांच्या अभ्यासक्रमात तिने दिलेल्या शेवटच्या परीक्षेत तिला ७३ तर वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सरासरी ५५ ते ६५ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत, असे संस्थेचे अधिष्ठाता हरीश अरोरा यांनी सांगितल़े
गेल्या वर्षीही गरवाल विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत तिला सहा विषयांमध्ये ११०० पैकी ८०० गुण मिळाले आहेत़  या परीक्षेनंतरच ती दिल्ली येथील रुग्णालयात इंटर्नशिप करण्यासाठी गेली होती, असेही अरोरा यांनी सांगितल़े
संस्थेने तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क परत करण्याचा, तसेच मुलीने दाखविलेल्या शौर्याबद्दल तिचा मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला आह़े  त्यामुळे शुल्क परतावा म्हणून २००८मध्ये मुलीने भरलेले १ लाख ८० हजार रुपये तिच्या कुटुंबीयांना परत मिळणार आहेत़  या राशीचा धनादेश कुटुंबीयांना देण्यासाठी स्वत: दिल्लीला जाणार असल्याची माहिती अरोरा यांनी दिली़
पीडितेवर कौतुकाचा वर्षांव करीत, अरोरा यांनी तिच्या अनेक गुणांचे वर्णन केल़े, तसेच तिच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितल़े

Story img Loader