दिल्लीत धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दिल्लीहून गाजियाबादला जाणाऱ्या कारमध्ये हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वसंत विहार पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
आरोपींनी घटनेचा बनवला व्हिडिओ
पीडित मुलगी वसंत विहार परिसरातील रहिवासी आहे. ती दिल्लीतील एका शाळेत दहावीत शिकते. ६ जुलै रोजी ती मोतीबाग येथील तिच्या मित्राच्या घरी गेली होती. रात्री परतत असताना वसंत गावच्या बाजाराजवळ दोन मुले दिसली, त्यांनी तिला फिरायला जाऊ असे सांगत सोबत नेले. त्यानंतर त्या दोन्ही आरोपींनी आपल्या आणखी एका मित्राला कार घेऊन बोलवले. फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिघांनी तिला कारमध्ये बसवले. त्यानंतर तिला कोल्ड ड्रिंकमध्ये दारू मिसळून पाजवली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हणले आहे. एवढेच नाही तर आरोपींनी घटनेचा व्हिडिओदेखील बनवला असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा- धक्कादायक! प्रियकराने तब्बल १४ वेळा करायला लावला गर्भपात, महिलेची आत्महत्या
तिनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेनंतर आरोपींनी पीडितेला भर रसत्यात सोडून पळ काढला. पीडितेने या प्रकरणी वसंत विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी आयपीसी कलम ३२३/३५४/३४२/३७६डी/३७७/५०६/३६३ आणि ६/८ पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तिनही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.