दिल्ली सामुहीक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज(बुधवार) राज्यसभेत काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगीतले. तसेच दिल्ली पोलिस आयुक्त निरज कुमार यांची भेट घेऊन गृहमंत्र्यांनी वाहनांवरील काळ्याकाचा काढून टाकण्यावर लक्ष देण्याचे सांगीतले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बसच्या समोरील काचेवर वाहनचालकाचा मोबाईल क्रमांक व परवान्याची प्रत असणे बंधनकारक करणार असल्याचे वृत्त आहे. बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षित यांना लिहीलेल्या पत्राची दखल घेत काँग्रेस मंत्र्यांची दिल्लीत आज बैठक झाली. या सभेत शिला दिक्षित यांनी घडलेला प्रसंग हा लज्जास्पद असल्याचे म्हटले.  

Story img Loader