दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणासंदर्भात आज ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाला सेशन न्यायालयातून ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात ट्रांसफर करण्यात आले आहे. कायदेतज्ञांच्या अंदाजानुसार, या प्रकरणातील सर्वात पहल्या चार्जशीटवर चर्चा होईल आणि आरोप लागू झाल्यानंतर ट्रायल सुरू होईल. न्यायालयात पहिल्यांदा सरकारी पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाईल आणि त्यानंतर ट्रायलच्या दरम्यान आरोपींची बाजू ऐकून घेतली जाईल. दोन्ही पक्षांच्या खुलाशानंतर शेवटची चर्चा होील, त्यानंतर ट्रायल न्यायालयाकडून अंतिम निर्णय दिला जाईल.
दिल्लीत चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व खुनाच्या घृणास्पद गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र घ्यावयाचे नाही, असा निर्णय साकेत बार असोसिएशनने घेतला होता.

Story img Loader