पीटीआय, नवी दिल्ली, चंडीगड
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या दोन आठवडय़ांपासून बंद करण्यात आलेल्या दिल्ली आणि हरियाणामधील सिंघू, टिकरी येथील सीमा अंशत: उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही सीमांवर प्रत्येकी एक मार्गिका उघडण्याची परवानगी दिल्याचे दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, ‘दिल्ली चलो’ मोर्चात जखमी झालेल्या आणि सध्या रोहतकमध्ये उपचार घेत असलेल्या प्रितपाल सिंग या शेतकऱ्याला पंजाब सरकारच्या ताब्यात देण्याची मागणी पंजाबचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी हरियाणाच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. प्रितपालवर पंजाब सरकार मोफत उपचार करेल असे वर्मा यांनी म्हटले आहे.