नवी दिल्ली : ‘बिंदास बोल’ हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुदर्शन न्यूज या खासगी दूरचित्रवाहिनीला मनाई केली.
हा कार्यक्रम जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, तिचे माजी विद्यार्थी आणि एकूणच मुस्लीम समुदायाला बदनाम करणारा व त्यांच्याविरुद्ध द्वेषभावना पसरवणारा असल्याचा आरोप करणारी याचिका विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी न्यायालयात केली होती.
हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री ८ वाजता प्रक्षेपित होणार होता. सनदी सेवांमध्ये ‘मुस्लिमांची घुसखोरी’ आम्ही उघड करू, असे वाहिनीने २६ ऑगस्टला ट्वीट केलेल्या प्रोमोमध्ये म्हटले होते.
आज रात ८ बजे शोक होगा’, असे या वाहिनीचे मालक व प्रमुख संपादक सुरेश चावनके यांनी ट्विटरवर लिहिले होते. ‘आम्हाला या प्रकरणी कुठलीही नोटीस मिळालेली नाही. अशी नोटीस मिळाली, तर ती वाचून आम्ही रात्री ८ वाजता आमचे म्हणणे सांगू’, असे त्यांनी सांगितले.