श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे सगळा देश हादरला होता. या प्रकरणात आफताब पूनावालाने त्याची प्रेयसी आणि लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ते महारौलीच्या जंगलात फेकले होते. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. अशात आता या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सगळ्या वृत्तवाहिन्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे?

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात जे चार्जशीट पोलिसांनी दाखल केलं आहे त्यातला मजकूर हा वृत्तवाहिन्यांनी उघड करू नये असा स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात ६ हजार पानांचं आरोपपत्र

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात पोलिसांनी ६ हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. ६ हजार ६२९ पानांच्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी विविध खुलासे केले आहेत. गुन्हा घडल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलीस किंवा तपास यंत्रणांकडे ९० दिवसांचा अवधी असतो. मात्र ७५ दिवसांतच चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. श्रद्धा वालकर ही वसईमध्ये राहणारी तरूणी होती. तिची हत्या दिल्लीत करण्यात आली. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालानेच तिला ठार केलं. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण उघडकीस आलं. आफताब मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकत होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आफताबला अटक करण्यात आली.

श्रद्धाच्या हत्येचं कारण काय?

चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार १७ मे २०२२ ला श्रद्धा तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. १८ मे २०२२ च्या दुपारी ती परतली.श्रद्धा तिच्या दुसऱ्या मित्राच्या घरी राहिली म्हणून आफताब नाराज झाला होता. याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी आधी पोलीस कोठडीत करण्यात आली होती.त्यानंतर आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आफताबची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ फेब्रुवारी २०२३ नंतर आरोपी आफताबला चार्जशीटची प्रत दिली जाईल. आफताबला पॉलिग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले त्यांचा यामध्ये समावेश आहे.

१८ मे २०२२ ला काय घडलं?

१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर या दोघांचा आवाज वाढला त्यावेळी श्रद्धा जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. हे भांडण का झालं होतं त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नव्हतं. जे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमुळे समोर आलं आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे आफताब पूनावालाने ३५ तुकडे केले होते. ते तुकडे तो महारौली येथील जंगलात फेकत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi hc restrains all news channels from displaying or playing content of charge sheet in shraddha walkar murder case scj