दिल्ली दंगलप्रकरणी UAPA कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद याने जामीन याचिका दाखल केली होती. मात्र दाखल केलेली जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (१८ ऑक्टोबर) फेटाळली आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती रजनिश भटनागर या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

हेही वाचा >>> जयललिता यांचा मृत्यू नेमका कसा झाला? चौकशी आयोगाचा अहवाल सादर; चार व्यक्ती कारणीभूत ठरल्याचा दावा!

उमर खालिद हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. २०२० साली झालेल्या दंगलीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल आहे. उमरला १३ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्याने जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

हेही वाचा >>> राजस्थानच्या मंत्र्याचे मोठे विधान, केली राहुल गांधींची प्रभू श्रीराम यांच्याशी तुलना, म्हणाले…

दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत उमर खालिद याच्यासह शर्जिल इमाम तसेच इतरांवर कारवाई करण्यात आली होती. ईशान्य दिल्ली तसेच जामिया परिसरात निघालेले मोर्चे आणि दंगलीला ते जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दिल्ली दंगलीनंतर खालिद आणि इतर अनेक जणांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. युएपीए हा दहशतवादविरोधी कायदा आहे. दरम्यान, खालिदसह इतरांवर दंगलीचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. या दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ७०० हून अधिक जखमी झाले होते.

Story img Loader