बौद्ध धर्माचे चौदावे दलाई लामा यांचा एक व्हिडीओ मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात व्हायरल झाला होता. यात दलाई लामा एका लहान मुलाला किस करताना दिसत होते. तसंच त्या मुलाला त्याच्या जिभेने त्यांच्या जिभेला स्पर्श करायला सांगत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला. दलाई लामांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, कारण दिल्ली उच्च न्यायालयाने दलाई लामा यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी ही मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे. दलाई लामा यांनी या प्रकरणात माफी मागितली आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच POSCO अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्या वर्षी नेमकं काय घडलं होतं?

मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत दलाई लामांनी एका लहान मुलाला मांडीवर बसवलं होतं. तसंच त्यांनी या मुलाला किस करत आपल्या जीभेला त्याला जीभेने स्पर्श करायला सांगितलं होतं. या व्हिडीओवरुन दलाई लामांवर टीकेचा भडीमार झाला. ज्यानंतर दलाई लामांनी या मुलाची तसंच त्याच्या कुटुंबाची माफी मागितली होती. “मी या मुलाची, त्याच्या कुटुंबाची तसंच माझ्या जगातल्या सगळ्या मित्रांची माफी मागतो.” असं दलाई लामा या प्रसंगानंतर म्हणाले होते. असं असलं तरीही दलाई लामांच्या विरोधात POSCO अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

हे पण वाचा- अमेरिकेचे शिष्टमंडळ दलाई लामांच्या भेटीला; चीनचा विरोध डावलून धर्मशाळा येथे दौरा

कोर्टाने काय म्हटलं आहे?

दलाई लामांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव यांच्या खंडपीठाने हे सांगितलं की, “न्यायालयाने मागच्या वर्षी दलाई लामा यांचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता तो पाहिला आहे. त्यात असं आढळलं आहे की जे काही घडलं ते चार चौघांच्या उपस्थितीत झालं आहे. तसंच दलाई लामा यांना भेटण्याची इच्छा मुलाने दर्शवली होती. दलाई लामा हे त्या मुलाशी खेळकरपणे वागत होते आणि त्याची गंमत करत होते असंही दिसतं आहे. दलाई लामा हे एका धर्माचे प्रमुख आहेत. तिबेटी संस्कृतीचे संदर्भही आम्हाला तपासावे लागतील. तसंच दलाई लामा यांनी जी कृती केली त्यासाठी त्यांनी आधीच माफी मागितली आहे. याची दखलही आम्ही घेत आहोत.” असं न्यायालयाने जनहित याचिका फेटाळताना म्हटलं आहे.

दलाई लामा हे नक्की कोण आहेत?

पंधराव्या शतकात तिबेटवर मंगोलियाचे वर्चस्व असताना या वंशातील राजपुत्र आल्तन खान याने ‘सोनाम ग्यात्सो’ या लामाला ‘ता’ अथवा ‘दलाई’ हा किताब दिला. दलाई लामा या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. म्हणूनच त्या भागातील तांत्रिक बौद्ध पंथावर मंगोलिया व चीन येथील धार्मिक विधींचा प्रभाव आहे. १६४२ मध्ये संपूर्ण तिबेटवर मंगोलियनांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या काळात दलाई लामा या पदाला धर्मप्रमुख म्हणून मान्यता देण्यात आली. यानंतर तिबेटमध्ये या पदाचे महत्त्व वाढत गेले. राजाचे प्रमुख सल्लागार म्हणून दलाई लामा कार्य करू लागले. कालांतराने राजाचे पद नामधारी राहिले व सगळी सत्ता दलाई लामांकडे एकवटली. तिबेटमध्ये दलाई लामा हे बोधिसत्व अलोकितेश्वराचा अवतार आहेत अशी मान्यता असल्यामुळे त्यांचे वर्चस्व सर्वमान्य होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi high court nixes pil over dalai lama kissing video row says he apologised already scj