नवी दिल्ली : दिल्लीतील सरकारी अधिकारी प्रेमोदय खाखा याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत जनहित याचिका दाखल केली. या प्रकरणी खाखा याला निलंबित करण्यात आले आहे. या खटल्यातील पीडितेची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> लातूरच्या अविष्कार कासलेची कोटामध्ये आत्महत्या, कोचिंग क्लासच्या परीक्षांवर दोन महिन्यांची बंदी

सरन्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठाने ही जनहित याचिका दाखल केली. पीडितेला योग्य संरक्षण आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे. पीडित मुलीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिल्ली सरकार आणि शहर पोलिसांनी खंडपीठाला दिली. खंडपीठाने दिल्ली सरकारच्या महिला-बालविकास विभाग, शहर पोलीस आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. न्यायालय पुढील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी घेणार आहे.  राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानेही बाजू मांडली.