Old Rajender Nagar Incident : दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पावसाचे पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यानंतर या आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर दिल्ली पोलिसांनी आज सकाळी त्या कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक केली. मात्र, दिल्लीतील या आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये कोणतीही परवानगी घेतल्याशिवाय लायब्ररी सुरु करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली.

या घटनेनंतर एमसीडीचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी घटनास्थळाची पाहणी करत या आयएएस कोचिंग सेंटरचे बेकायदा तळघर सील करण्यात आले आहे. याचबरोबर दिल्लीतील तळघरात चालणाऱ्या सर्व बेकायदा कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तारिक थॉमस यांनी दिली. तसेच तपास पथकाच्या माहितीनुसार, आतापर्यंत दिल्लीत तळघरांमध्ये सुरु असलेली बेकायदेशीर १३ कोचिंग सेंटर्सही सील करण्यात आले असल्याचे वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हेही वाचा : Delhi Coaching Incident: दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…”

दरम्यान, या आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरातील घटनेत यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांशी एमसीडीचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी संवाद साधला. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या घटनेच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून आम्ही दिल्ली अग्निशमन विभागाला या इमारतीसंदर्भात आणि तळघरामध्ये सुरु असलेल्या लायब्ररीच्या संदर्भात अहवाल देण्यास सांगितले असल्याची माहितीही आयुक्त तारिक थॉमस यांनी दिली. याचबरोबर इमारतीच्या तळघरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजिंदर नगरमधील सर्व कोचिंग सेंटर्स सील करण्याची प्रक्रिया एमसीडीकडून सुरु करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी सांगितली. तसेच या संदर्भात दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनीही स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. गरज पडल्यास संपूर्ण दिल्लीत ही मोहीम राबवण्यात येणारचं महापौर शैली ओबेरॉय यांनी म्हटलं.

नेमकं घटना काय घडली?

दिल्लीमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत श्रेया यादव, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया यादव ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यानंतर दिल्लीच्या महापौर शेली ओबरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दुसऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात केली आहे. तसेच परवानगीशिवाय इमारतीच्या तळघरामध्ये लायब्ररी स्थापन करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.