दिल्लीतील कंझावाला अपघात प्रकरणी पोलिसांनी गाडी मालकासह सहा आरोपींना अटक केली होती. तसेच पोलीस सातव्या आरोपीच्या शोधात होते. दरम्यान, या प्रकरणातील सातवा आरोपी अंकुशने शुक्रवारी रात्री सुल्तानपुरी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Kanjhawala Death : “अचानक निधी आणि अंजलीचं भांडण सुरू झालं आणि..” ‘त्या’ रात्री काय घडलं? मित्राने सांगितला घटनाक्रम

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कंझावाला येथे अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला कार चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.

हेही वाचा – Delhi Sultanpuri Accident : १२ किलोमीटर फरफटत नेलेल्या तरुणीबरोबर दुचाकीवर होती मैत्रिण; काय झालं तिचं?; प्रकरणाला नवं वळण

तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गाडी मालक आशुतोषला अटक केली होती. आशुतोषने आरोपींना पळून जाण्यास मदत केली होती. आरोपी १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी रोहिणीतील सेक्टर १ मध्ये पोहोचले होते. यावेळी आशुतोषही तिथे उपस्थित होता. आरोपींनी त्यापूर्वीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi kanjhawala accident seventh accused ankush surrender spb